हार्दिक पटेलच्या वयापेक्षा दुप्पट अण्णांचा सामाजिक कामाचा अनुभव-सुरेश पाठारे

नवी दिल्ली :  लोकपालसाठी रामलीला मैदानावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आंदोलन करत आहेत. परंतु, या आंदोलनाला संघाची फूस असल्याचा आरोप पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी केला आहे. दरम्यान,  ‘हार्दिक पटेल हे पाटीदार आंदोलनातून मोठे झाले आहेत. त्यांचे आता जेवढे वय आहे त्याच्यापेक्षा दुप्पट अण्णांचा सामाजिक कामाचा अनुभव आहे.’ अशा शब्दात अण्णांच्या आंदोलनात पहिल्यापासून सोबत असणारे सुरेश पाठारे यांनी हार्दिक पटेल यांना उत्तर दिले आहे.

‘हार्दिक पटेल हे पाटीदार आंदोलनातून मोठे झाले आहेत. त्यांचे आता जेवढे वय आहे त्याच्यापेक्षा दुप्पट अण्णांचा सामाजिक कामाचा अनुभव आहे. ज्या-ज्या वेळेस अण्णांनी काँग्रेस असताना आंदोलनं केली त्यावेळेस त्यांना संघाचे ठरवले  गेले. तर भाजपविरोधात आंदोलने केली तर काँग्रेसधार्जिणं ठरवले जाते,  असे सुरेश पाठारे यावेळी म्हणाले.

‘2011 चे आंदोलन आणि आत्ताचे आंदोलन यामध्ये लोकपाल हा विषय सोडला तर बाकी विषय हे शेतकऱ्यांशी निगडीत आहे. शेतकरी हा या आंदोलनाचा केंद्रबिंदू आहे. पूर्वीच्या आंदोलनात शहरी भागाशी निगडीत होते. त्यामुळे शहरात राहणाऱ्या लोकांची संख्या तेव्हा जास्त होती. पण आता शेतकऱ्यांना दिल्लीत येणं थोडसं खर्चिक आहे. त्यामुळे आंदोलनाला गर्दी कमी आहे, असे सुरेश पाठारे यावेळी म्हणाले.

जनतेला अण्णांबाबत आणि त्यांच्या आंदोलनांबाबत गेल्या 40 वर्षापासून माहिती आहे. हार्दिक तारतम्य नसल्यासारखे बोलत आहेत. त्यांना इथे येऊन स्टेजवर बोलायचे आहे. तशी त्यांची इच्छा दिसते. पण अण्णांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले आहे की, कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तीला स्टेजवरुन भाषण देता येणार नाही. हवे तर ते पाठिंबा देण्यासाठी इथे येऊ शकतात.’ असेही पाठारे म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

  1. वरील वृत्त वाचण्यात आले श्री अण्णांच्या वयाबाबत अनुभवा बाबत व त्यांनी ह्या अगोदरच्या आंदोलनाबाबत कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही व नसावे परंतु आजच्या तरुण पिढीच्या अपेक्षा व सध्याचे दिवसेंदिवस बदलणारे वातावरण विचारात घेता, राजकारणाचे व्यवसायात होणारे परिवर्तन, राजकीय स्वार्था साठी दिलेली आश्वासने इत्यादींचा सर्वांगीण अभ्यास करता ह्यावर हे आंदोलनाचे जुने उपाय कितपत परिणामकारक ठरू शकतात ? आज पर्यंत श्री अण्णांनी केलेल्या उपोषणाने त्यांच्या मागण्या प्रमाणे 100% मागण्या पूर्ण झालेल्या व प्रत्यक्ष कृतीत आलेल्या अशी किती उपोषणे यशस्वी झालेली पाहावयास मिळतील ? नुसती आश्वासने मिळालीत म्हणजे उपोषणे यशस्वी झालीत असे समजावे का ?उलट त्यांच्या अशा उपोषणाचा त्यांच्याशी असलेल्या संबंधाचा त्यांच्या उपोषणात सहभागी झालेल्यांची स्वतःच्या स्वार्थासाठी राजकीय फायदा घेतल्याची उदाहरणे आपण पाहतोच आहोत असे होण्यास त्यांचा निभाव वय हे कमी पडलेअसे समजावे का ? कि हा उपोषणाचा जुना मार्ग निरूपयोगी ठरत आहे असे समजावे ? आजची तरुण पिढी थांबण्यास तयार नाही ह्याची श्री अण्णांना नकीच जाणीव असावी असे समजल्यास चूक ठरू नये तेव्हा १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या ह्या देशात त्यांच्या विचारसरणीचे, चारित्रवान चरित्रवान सुशिक्षित श्क्षित असे ५०० उमेदवार मिळणे सहज शक्य आहे अशांचा स्वतंत्र पक्ष स्थापून प्रत्येक निवडणुकीत ह्याच व्यक्तींना मतदान करण्याचे व त्यांनाच निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणे हा उपाय यॊग्य ठरणार नाही का ?वयाने अर्ध्या वयाच्या व अनुभव नसलेल्या पटेलला जर समाजाकडून मान्यता मिळते तर हा नवीन उपाय कृतीत आणल्यास मतदार स्स्वीकारणार नाहीत का ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)