हार्दिक पांड्या आणि राहुलला बीसीसीआयच्या प्रशासक समितीकडून तूर्तास दिलासा

नवी दिल्ली: कमेटी ऑफ एडमिनिस्‍ट्रेटर्स प्रमुख विनोद राय यांनी हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांना महिलांविषयी विवादास्पद वक्तव्य केल्यामुळे जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत निलंबित केले होते. बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी प्रशासक समितीकडे या दोघांवर चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत निलंबन मागे घेण्याची मागणी केली होती.

दरम्यान, दोघांवरील निलंबनाची कारवाई तूर्त मागे घेण्यात आली असून पंड्याला आता न्यूझीलंड दौऱ्यावर धाडण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, पांड्या -राहुल प्रकरणी सुप्रीम कोर्टात ५ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कॉफी विथ करण या कार्यक्रमात हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांनी काही वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्यानंतर त्यांच्यावर समाजाच्या सर्व स्तरातून टिका केली जात असून हार्दिक पांड्याने आपल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर माफी देखिल मागितली होती. मात्र, पंड्याने दिलेल्या उत्तरावर समाधानी न झालेल्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी त्या दोघांवर दोन एकदिवसीय सामन्यांची बंदी घालण्यात यावी असा प्रस्ताव प्रशासकीय समीती समोर ठेवला होता.मात्र बीसीसीआयच्या प्रशासक समितीकडून या दोघांना दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)