हार्दिक पंड्याने चौथ्या वेळेस गर्लफ्रेंड बदलली

क्रिकेटपटू हार्दिक पंड्या त्याच्या खेळाबरोबरच ऍटिट्युड आणि स्टाईलसाठीही ओळखला जातो. या आपल्या स्टाईलमुळे सध्या बॉलिवूडवर्ल्डमध्ये त्याची क्रेझ वाढली आहे. यापूर्वी हार्दिक पंड्याचे नाव शिवानी दांडेकर आणि परिणिती चोप्राबरोबर जोडले गेले होते. त्यानंतर एली एवरामबरोबरही त्याची जवळीक वाढली होती. हार्दिक पंड्या ज्या हिरोईनबरोबर ओळख करून घेतो, तिचे नाव त्याच्याबरोबर “सध्याची गर्लफ्रेंड’म्हणून जोडले जाते, असा एक अलिखीत ट्रेंड बनायला लागला आहे.

सध्या हार्दिकचे नाव उर्वशी रौतेलाबरोबर जोडले गेले आहे. गौतम सिंघानियाच्या पार्टीमध्ये या दोघांची नुकतीच ओळख झाली होती. यावेळी हार्दिकचा भाऊ कुणाल देखील उपस्थित होता, मात्र उर्वशीची नजर हार्दिकवरच खिळलेली होती. दोघेही जुनी ओळख असल्याप्रमाणे हसून खेळून गप्पा मारत होते. अजून स्वीडीश मॉडेल एली एवरामबरोबरच्या हार्दिकच्या अफेअरची चर्चा नुकतीच सुरू झाली होती. हे दोघेजण अर्ध्या रात्रीही हातात हात घालून भटकताना दिसत होते. या दोघांना जेंव्हा मिडीयावाल्यांनी गाठले होते, तेंव्हा त्यांनी चक्क चेहरे लपवण्याचा प्रयत्न केला होता. हार्दिक आणि एवरामबाबतची चर्चा थांबतही नाही, तोपर्यंत त्याने चौथी गर्लफ्रेंड मिळवली सुद्धा.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)