“हायपरलूप’ पायाभूत सुविधा प्रकल्प घोषित

व्यवहार सल्लागार नियुक्तीस मान्यता : पुणे-मुंबई प्रवास फक्त 15 मिनिटात

पुणे – पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) पुणे-मुंबई दरम्यान हायपरलूप प्रकल्प राबविण्यात येणार आहे. शासनाने हायपरलूप प्रकल्पाला “सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्प’ म्हणून घोषित केला आहे. त्याचबरोबर शासनाने या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी व्यवहार सल्लागार यांची नियुक्ती करण्यासही पीएमआरडीएला मान्यता दिली आहे. यामुळे स्वप्नवत वाटणारा हायपरलूप प्रकल्प उभारण्यासाठी एक पाऊल पुढे पडले आहे. हायपरलूप तंत्रज्ञानाने पुणे-मुंबई हा प्रवास फक्त 15 मिनिटात करणे शक्‍य होणार आहे.

सार्वजनिक वाहतूक क्षेत्रातील क्रांती समजला जाणारा हायपरलूप हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला आहे. या प्रकल्पामुळे पुणे-मुंबई शहरातील 2 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येला याचा फायदा होणार आहे. पीएमआरडीएने हा प्रकल्प स्विस चॅलेज पद्धतीने निविदा राबविण्यात येणार आहे. पीएमआरडीएने हायपरलूप प्रकल्प महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास सक्षम प्राधिकरणाकडे सप्टेंबर महिन्यात सादर केला होता. या प्रकल्पाच्या अनुषंगाने महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास सक्षम प्राधिकरणाच्या बैठकीत पुणे-मुंबई हायपरलूप प्रकल्पास “सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्प’ म्हणून मान्यता दिली आहे. त्यानुसार शासनाच्या नगरविकास विभागाने हायपरलूप प्रकल्पास पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून घोषित केला असून त्यासाठीचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.

त्याचबरोबर हायपरलूप प्रकल्पासाठी डीपी वर्ल्ड एफझेडई व हायपरलूप टेक्‍नॉलॉजीज, आयएनसी या कंपन्यांना मूळ प्रकल्प सूचक म्हणूनही शासनाने मान्यता दिली आहे. त्याचबरोबर या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पीएमआरडीएने व्यवहार सल्लागाराची नियुक्ती करण्यासही शासनाने मान्यता दिली आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी शासनाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करता येणार आहे. त्यानुसार पीएमआरडीएचे अभियांत्रीकी विभागाचे मुख्य अभियंता यांना “पद निर्देशित अधिकारी’ म्हणून नियुक्त करण्यासही शासनाने मान्यता दिली आहे.

पुणेकरांना दिवाळी भेट
पुणे-मुंबई हायपरलूप प्रकल्पाला “सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्प’ म्हणून मान्यता मिळण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. त्यास शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे या प्रकल्पासाठी आवश्‍यक असलेल्या परवानग्या लवकर मिळणे शक्‍य होणार आहे. राज्य शासनाने पुणेकरांसाठी दिलेली ही दिवाळी भेट असल्याची प्रतिक्रिया प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते यांनी व्यक्‍त केली.

वाहतूक क्षेत्रात होणार क्रांती
हायपरलूप हा वाहतुकीचा एक नविन प्रकल्प असून कमी दाबाच्या निर्वात पोकळीमधून इलेक्‍ट्रो-चुंबकीय प्रणोदकांमधून प्रवाशांची वाहतूक केली जाते. अत्यंत जलद व थेट अशा वाहतुकीचा प्रकार असून 1080 किलोमीटर ताशी वेग असणारी ही वाहतूक व्यवस्था आहे. हायपरलूप ही कार्यक्षम, सुरक्षित व विश्‍वासार्ह वाहतूक प्रणाली असून हायस्पीड रेल सिस्टीमच्या खर्चाच्या दोन तृतीयांश इतक्‍या खर्चात ही यंत्रणा विकसित करण्यात येईल. त्यामुळे या तंत्रज्ञानामुळे वाहतूक क्षेत्रात क्रांती होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup:
8 :heart:
0 :joy:
8 :heart_eyes:
5 :blush:
2 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)