हायपरलूपसाठी नोंदविता येणार हरकती

पुणे – सार्वजनिक वाहतूक क्षेत्रातील क्रांती समजला जाणारा हायपूरलूप हा महत्त्वकांक्षी प्रकल्प राबविण्याचा निर्णय पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) घेतला आहे. या प्रकल्पासाठी हरकती मागविल्या जाणार आहेत. हायपरलूप प्रकल्पामुळे हितसंबधित व्यक्तीस किंवा थेट बाधित होणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस हरकत नोंदविता येणार आहे. हायपरलूप प्रकल्पामुळे पुणे-मुंबई हे अंतर फक्त 30 मिनिटांत पार करता येणार आहे.

हायपरलूप प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी “व्हर्जिन हायपरलूप वन’ या अमेरिकन कंपनीने व्यवहार्यता अहवाल तयार केला आहे. प्राधिकरणाने पुणे-मुंबई हायपरलूप प्रकल्पाला नगर विकास विभागाने “पायाभूत सुविधा प्रकल्प’ म्हणून घोषित केले आहे. तसेच “डीपी वर्ल्ड एफझेई व हायपरलूप टेकनॉलॉजीज आयएनसी’ या भागीदारी कंपनीस “मूळ प्रकल्प सूचक’ म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

या प्रकल्पाची अंमलबजावणी “स्विस चॅलेंज पद्धती’ तत्वावर करण्यात येत आहे. तसेच प्रकल्पासाठीचा खर्च हा खासगी गुंतवणुकीतून केला जाणार आहे. हा प्रकल्प दोन टप्प्यात करणे प्रस्तावित असून पहिल्या टप्प्यात पुणे महानगर क्षेत्रामध्ये सुमारे 14 किलोमीटर डेमो ट्रॅकची निर्मिती करण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात पुणे-मुंबई या दोन महानगरांना जोडण्यासाठी मार्ग तयार करण्यात येणार आहे.

या प्रकल्पाबाबत किंवा सदर प्रकल्पाचा मूळ प्रकल्प सूचक असलेल्या अशा व्यक्तीविरुद्ध त्याच्या मालकीविषयक, बौद्धिक संपदा हक्क स्वतःहून किवा त्याच्यावतीने दोषपूर्ण रीतीने प्राप्त केला असल्यास आदीबाबींसह प्राधिकरणाकडे हरकती नोंदविता येणार आहे.

हा प्रकल्प उच्च तंत्रज्ञानावर आधारित या प्रकारचा देशातील पहिला नावीन्यपूर्ण प्रकल्प आहे. नागरिकांना सुरक्षित आणि अति वेगवान प्रवासाचा अनुभव या तंत्रज्ञानामुळे घेता येणार आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)