हायकोर्टाचे चोबदार अनंत कुंभार सेवा निवृत्त

मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाचे चतुर्थश्रेणी कर्मचारी ते मुख्य न्यायमूर्तींच्या कार्यालयातील चोबदार म्हणून कार्यरत असलेले अनंत गंगाराम कुंभार एक उत्साही व्यक्तीमत्व.न्यायालयाच्या 42 वर्षाच्या सेवेनंतर वयाच्या 62व्या वर्षी 31 ऑगस्ट 2017 रोजी चोपदार म्हणून सेवा निवृत्त होत आहेत.

कुंभार यांची कामकाजातील कार्यतत्परता, वक्तशिरपणा, शिस्त, मेहनत, प्रामाणिकपणा आणि सर्वाशी नम्रतेने वागणूकीमुळे न्यायालयात येणाऱ्या पक्षकारापासून कनिष्ठ ते ज्येष्ठ वकील, न्यायालयातील कनिष्ठांपासुन वरिष्ठांशीपर्यंत स्नेहाचे संबध जोडले. न्यायालयाच्या 44 वर्षे आठ महिने आणि 17 दिवसांच्या वर्षाच्या सेवेनंतर चोपदार म्हणून सेवा निवृत्त होत आहेत.

गेले 45 वर्षे चतुर्थ कर्मचारी ते चोपदार असा प्रवास केला. एक हसतमुख व्यक्तीमत्व म्हणून त्यांनी सर्वासमोर आदर्श निर्माण केला आहे. पक्षकाराबरोबरच कनिष्ठ वकिलासह ज्येष्ठ वकीलांसाठी धावून जाणारी व्यक्ती म्हणून नावलौकीक मिळविला. हे करताना त्यांनी आपल्या कामाशी कधी तडजोड केली नाही. वर्षाच्या 60व्या वर्षी सेवा निवृत्त होत असताना तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी त्यांच्या कामाची दखल घेवून आपल्या अधिकारात त्यांना आणखी दोन वर्षे सेवा वाढवून दिली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)