हाफिज सईदच्या मोकाट वावराबद्दल अमेरिकेलाही चिंता

वॉशिंग्टन – लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक हाफिज सईद मोकाटपणे पाकिस्तानात वावरतो. पाकिस्तान त्याला उजळ माथ्याने फिरू देत असल्याबद्दल भारताला वाटणाऱ्या चिंतेशी अमेरिकेने सहमती दर्शवली आहे.

मुंबईत झालेल्या महाभयंकर दहशतवादी हल्ल्यांचा (26/11) सईद सूत्रधार आहे. त्याला अमेरिकेने याआधीच आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. याशिवाय, त्याच्यासाठी 1 कोटी डॉलर्स इनामही जाहीर केले आहे. असे असले तरी सामाजिक कार्यकर्ता असल्याचा दिखावा करून सईद पाकिस्तानात मुक्तपणे वावरतो. त्याच्यावर कारवाई करण्यासाठी भारत आणि अमेरिकेकडून पाकिस्तानवर सातत्याने दबाव टाकला जात आहे. मात्र, पाकिस्तानकडून कानाडोळा केला जात आहे. मुंबईतील त्या दहशतवादी हल्ल्यांत 166 जण मृत्युमुखी पडले. मृतांमध्ये काही अमेरिकी नागरिकांचाही समावेश होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)