हाफिज सईदच्या मेव्हण्याने केला शिखांचा अपमान

मुल्तान : पाकिस्तानातील लष्कर- ए- तोयबा या दहशतवादी संघटनेचा नेता अब्दुल रहमान मक्कीने शीखांचे पहिले गुरु गुरु नानक देव यांचा अपमान केला आहे. आज अनेक शीख दहशतवाद्यांनी पाकिस्तानात आश्रय घेतला आहे.  इस्लामची बदनामी करण्याचे कारस्थान गेल्या अनेक शतकांपासून सुरु आहे. शीखांचे पहिले गुरु गुरु नानक हे सुद्धा या कारस्थानामध्ये सहभागी होते ते सुद्धा इस्लामची बदनामी करण्यामध्ये समान गुन्हेगार आहेत असे वादग्रस्त विधान मक्कीने मुल्तानमध्ये लष्करच्या समर्थकांसमोर बोलताना केले.

मक्कीने त्याच्या भाषणात शीख समाज, त्यांचा विश्वास आणि विचारधारा याबद्दल अत्यंत अपमानास्पद शब्द वापरले तसेच शिखांवर इस्लामविरोधात कट रचल्याचा आरोप केला. गुरु नानक देव हे भारतासह जगभरातील शीख धर्मियांचे श्रद्धास्थान आहेत. मक्की भारताला हवा असलेला मोस्ट वाँटेड दहशतवादी हाफिज सईदचा मेहुणा आहे तसेच लष्कर-ए-तोयबामध्ये तो दुसऱ्या क्रमांकाचा नेता आहे. पाकिस्तानातील मुल्तान शहरात एका कार्यक्रमात बोलताना त्याने गुरु नानाक देव यांच्याबद्दल अपमानास्पद भाषा वापरली.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)