हाती शस्त्रे घेऊन फिरणे हीच का प्रभू रामचंद्राची शिकवण? -ममता बॅनर्जी

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये रामनवमीच्या मुद्द्यावरून आता तृणमूल काँग्रेस आणि भाजपा यांच्यात सध्या चांगलाच वाद निर्माण झाला आहे. हिंदू समाजातील सणांवर आणि रिती रिवाजांवर ममता बॅनर्जी टीका करत आहेत असा आरोप भाजपा नेत्यांनी केला होता. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनीही भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जशास तसे उत्तर दिले आहे. हाती शस्त्रे घेऊन फिरणे हीच का प्रभू रामचंद्राची शिकवण? असा प्रश्न पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विचारला आहे.

प्रभू रामचंद्र यांना आपण कधीतरी हाती बंदुक घेतलेले पाहिले आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाचे कार्यकर्ते रामनवमीच्या दिवशी हाती तलवार आणि बंदुका घेऊन फिरत होते हीच का प्रभू रामचंद्राची शिकवण? असाही प्रश्न ममता बॅनर्जी यांनी विचारला आहे. हत्यारे घेऊन जी रॅली काढण्यात आली त्यामुळे पश्चिम बंगालची जनता दहशतीत आहे. ही पश्चिम बंगालची संस्कृती नाही. रामनवमीच्या आधीही हिंसाचाराचे काही प्रसंग घडले. हे कदापि सहन केले जाणार नाही असाही इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)