हाती टाळ, वृंदावन डोईवरी, विद्यार्थी झाले वारकरी

  • कळंब येथे भागवती एकादशीनिमित्त बालदिंडी उत्साहात

मंचर – कळंब (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि कमलजादेवी प्री-प्रायमरी इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. 8) आषाढी भागवत एकादशीचे औचित्य साधून शाळेमध्ये दिंडी काढण्यात आली.
इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांना मराठी सणांची माहिती व्हावी, यासाठी शाळेमध्ये असे उपक्रम राबविले जातात, असे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गंगाराम भालेराव यांनी सांगितले. या दिंडी सोहळ्यामध्ये संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, विठ्ठल-रुक्‍मिणी आणि वारकरी अशा भूमिकेमध्ये विद्यार्थी शाळेमध्ये आले होते. मुलींनी नऊवारी साड्या नेसून, डोक्‍यावर तुळशी वृंदावन घेतले होते, तर मुलांनी हातात पताका, गळ्यात तुळशीमाळा घेत या दिंडी सोहळ्यातून स्वच्छताविषयक संदेश दिले. यामध्ये कचरा कुंडीचा वापर करा, सुंदर परिसर निर्माण करा, स्वच्छता वसे तेथे आरोग्य वसे, स्वच्छ घर सुंदर परिसर, शौचालय असेल तेथे खरी प्रतिष्ठा येईल, शौच खड्ड्यांचा वापर करा… असे पर्यावरणपूर्वक संदेश देत “झाडे लावा, झाडे जगवा’ अशा घोषणा दिल्या.
कळंब चौकात दिंडीच्या पालखीचे पूजन माधव भालेराव यांनी केले. येथे मुलींनी फुगडी खेळून आनंद व्यक्त केला. शाळकरी मुलांनी टाळ-मृदंग आणि विणा वादनात ज्ञानोबामाउली-तुकाराम, तसेच विठ्ठल-रुक्‍मिणीचा गजर केला. गावातून प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरांमध्ये पुजारी प्रशांत गुरव यांनी मुख्याध्यापक विठ्ठल गभाले यांच्या हस्ते विधिवत पूजा केली. उपस्थित सर्व मुलांना राजगिरा चिक्कीचे वाटप करण्यात आले. दिंडी सोहळा यशस्वी होण्यासाठी संतोष कानडे, गणेश लोहकरे, सुनंदा भालेराव, मीना निराळी, गीतांजली शेलार, आदिती चिखले, शितल रामकर, स्वाती भालेराव, सनाह शेख आणि मदतनीस मनीषा गोसावी, राजश्री भालेराव यांनी प्रयत्न केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)