हातातून सत्ता गेली तरी बेहत्तर पण महिलांचा मानसन्मान महत्त्वाचा -सुप्रिया सुळे

कोपरगाव : सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणतात की, पसंत असलेली मुलगी दाखवा मी उचलून आणतो. असे बोलायची हिंमत कशी होते? हा महाराष्ट्र कुठे चाललाय? अशा आक्षेपार्ह वक्तव्यावरही मुख्यमंत्र्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. मी मुख्यमंत्र्यांच्या जागी असते तर तात्काळ आ.राम कदम यांचा राजीनामा घेतला असता, हातातून सत्ता गेली तरी बेहत्तर पण महिलांचा मानसन्मान महत्त्वाचा आहे, असा घणाघात खा. सुप्रिया सुळे यांनी केला.

कोपरगाव येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. आघाडी सरकारच्या काळात महिलांचा मान राखला गेला, स्व. आर. आर. आबा यांच्या निर्णयामुळे आज महीला पोलीस महाराष्ट्रात दिसत आहेत, मुलींना समान अधिकार देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच पुढाकार घेतलाय, याचा अभिमान आपल्याला असल्याचे वक्तव्य सुळे यांनी केले.

-Ads-

आज लोकांच्या मनात, तरुणांच्या मनात सरकारबद्दल प्रचंड नाराजी आहे. सरकारने दिलेले आश्वासन फसवे निघाले म्हणून एका विद्यार्थिनीने मला प्रश्न विचारला की, पंतप्रधान मोदी सत्य कधी बोलणार ? मी त्या मुलीच्या वतीने लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा प्रश्न विचारेन, असेही सुळे पुढे म्हणाल्या.

Posted by Supriya Sule on Thursday, 4 October 2018


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
8 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)