हातातील धागा, कानातील बाळीवरून खुनातील मृतदेहाची पटली ओळख

सासवड- भिवडी (ता. पुरंदर) येथे अनोळखी व्यक्तीचा खून करून ओळख लपविण्यासाठी मृतदेह जाळून टाकल्याचा प्रकार उघडकीस आला होता. केवळ हातातील धागा आणि कानातील बाळीवरून पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मृतदेहाची ओळख पटविण्यात यश आले आहे.
अभिजित अजय सिंग (वय 19, रा. शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे) असे या मयताचे नाव आहे. या संदर्भात शिक्रापूर पोलीस ठाण्यात अभिजित सिंग हरविल्याची तक्रार केल्यावर केवळ एकाच दिवसात ओळख पटविण्यात आली आहे. दि. 26 ऑक्‍टोंबरला पुरंदर तालुक्‍यातील नारायणपूर-कोडीत रस्त्यावरील भिवडी गावच्या हद्दीत एक अनोळखी प्रेत सापडले होते. धारदार हत्याराने खून करून या ठिकाणी प्रेत आणून टाकण्यात आले होते तसेच मृतदेहाची ओळख पटू नये, यासाठी त्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत सासवड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येवून पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निरंजन चौखंडे तपास करीत होते.
दरम्यान, शिक्रापूर पोलीस ठाण्यात मयत अभिजित सिंग हरविल्याची तक्रार दि. 28 ऑक्‍टोंबरला त्याच्या वडीलांनी दाखल केली होती. तसेच यामध्ये अभिजीत याचे वर्णन करण्यात आले होते. या मिसिंगचा तपास पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जिवन राजगुरू, पोलीस हवालदार चंद्रकांत झेंडे, जगदीश शिरसाट करीत होते. त्यानुसार भिवडी (ता. पुरंदर) येथील मृतदेह संपूर्ण जळाला असल्याने ओळख पटविणे अवघड होते. परंतु, शिक्रापूर पोलीसांत दाखल तक्रारीतील वर्णनानुसार अंदाज घेत गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी मयत अभिजीत सिंग यांच्या वडिलांना बोलावून मृतदेहाची खात्री केली. हातातील बांधलेला धागा, कानातील चांदीची बाळी आणि शर्टची थोडी बाही यावरून ओळख पटविणे शक्‍य झाले. त्यानंतर ससून रुग्णालयात मृतदेह सिंग कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. या मृतदेहाची ओळख पटली असली तरी खून नेमका कोणी व का केला याचा तपास बाकी असून आरोपीचा शोध घेणे पोलीसांपुढे मोठे आव्हान आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
1 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)