हाताचे सौंदर्य असे राखा

तुमचे हात खूपच नाजूक असतील तर मालीशने त्यांना सुयोग्य रूप देता येतं. जाड्या, थुलथुलीत हातांसाठीही मालिश हा चांगला उपाय आहे. कारण मालीशमुळे अतिरिक्त चरबी विरघळते व त्वचेतील रक्तप्रवाह सुरळीत होतो. मॉलिशसाठी राईचा उपयोग करता येऊ शकतो. हातांची त्वचा खूप कोरडी असेल तर दररोज रात्री झोपताना ग्लिसरीन, गुलाबपाणी किंवा लिंबाचा रस समप्रमाणात मिसळून मालिश करा. स्नान केल्यानंतर मॉईश्‍चरायझर किंवा क्रिम अवश्‍य लावा. उन्हात जाण्यापूर्वी सनस्क्रीन क्रीमचा वापर करा.

हातांचं सौंदर्य राखताना हातांचे दोन्ही कोपरे दुर्लक्षून चालणार नाहीत. हा भाग नेहमीच उपेक्षीत राहतो. म्हणूनच तिथे मळाचा थर साचल्यामुळे तेथील त्वचा कडक करण्यासाठी लिंबू कापून त्याचा अर्धा भाग तिथे रगडा. आंघोळ केल्यावर खरखरीत टर्कीश टॉवेलने रगडून कोल्ड क्रीमने मसाज करा. याशिवाय हातांवर उगवणारे केसही सौंदर्याला बाधा आणतात. म्हणूनच हे अनावश्‍यक केस काढण्यासाठी वॅक्‍सिंग हा सर्वोत्तम उपाय आहे.

वॅक्‍सिंग एखाद्या ब्युटी पार्लरमध्ये जाऊन किंवा घरातही करू शकता. यासाठी बाजारात यासाठी बाजारात कोल्ड वॅक्‍स उपलब्ध आहे. वॅक्‍स केसांच्या वाढीच्या दिशेने लावा आणि त्यावर कपड्याची जाड पट्टी चिकटवा आणि मग वेगाने झटका देऊन ती पट्टी केंसांच्या विरूद्ध दिशेने खेचा. त्यामुळे सगळे केस कापड्याच्या पट्टीवर चिकटतील, सर्व केस काढल्यावर दुर्गंधीपासून बचावासाठी डिओडोरंटचा वापर करा.

सुडौल हातांसाठी व्यायामाचीही खूप आवश्‍यकता आहे. यामुळे काखेत चरबी जमा होत नाही. हाताच्या सुडौलतेसाठी खालीलप्रमाणे व्यायाम कधीही कोणत्याही वेळी करू शकता.सरळ उभे राहून हात समोरच्या दिशेला नेऊन गोलाकार फिरवा. अशा प्रकारचा व्यायाम दोन्ही हातांनी दहा-दहा वेळा करा. हळूहळू हे प्रमाण वाढवा.दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून उभे रहा. कंबर ताठ ठेवा. हात मानेच्या मागे ठेवा आणि शरीर डाव्या- उजव्या बाजूला वळवा. ही क्रिया करताना जेव्हा चेहरा सरळ रेषेत असेल तेव्हा श्‍वास घ्या व एक फेरी झाल्यानंतर श्‍वास सोडा. अशा प्रकारे व्यायाम करून हातांची काळजी घेतल्यास हात सुंदर व सुडौल होतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)