हातांची मालीश करताना…

दोन्ही हात प्रथम एकमेकांत गुंतवा. हात गारठले असतील तर कोमट पाण्यात थोडावेळ ठेवा. मग पुसून त्यावर क्रीम लावा. मालीशसाठी चांगल्या प्रतीचं क्रीम वापरा.


आधी क्रीम तळहातांवर खूप चोळा. मग हाताच्या मागच्या बाजूला लावा.


बोटांची बाह्यरेषा, नखांच्या आसपासचा भाग मालीश करताना लक्षपूर्वक चोळा. बोटांच्या पेरापासून कोपरांपर्यंत व्यवस्थित मसाज करा. त्यानंतर काही वेळ तरी हातांना विश्रांती द्या.
हातांचे व्यायाम


जर हातांना नियमितपणे व्यायाम दिला तर अधिक सुंदर व निरोगी राहतील.


व्यायाम करण्यासाठी दोन्ही हातांच्या मुठी घट्ट बंद करा. काही क्षण बोटं आवळून धरा व मुठी उघडा. बोटं जितकी ताणता येतील तेवढी ताणा. हा व्यायाम सहा वेळा करा.


या व्यायामात हात सरळ व ताणून ठेवा. मुठी उघडा. पुन्हा मिटा. हा व्यायामही सहा वेळा करा.


तिसऱ्या व्यायामात हात मनगटापर्यंत सैल सोडून हलवा. थोडा वेळ या स्थितीत ठेवल्यावर हात मनगटांसह वर घ्या. सहा वेळा करा.


या व्यायामात प्रथम हात समोर ताणून ठेवा. मग दोन्ही हातांच्या मुठी अलगद बंद करून मनगटापासून आत दहा वेळा व बाहेर दहा वेळा मुठी फिरवा.


दोन्ही हातांची बोटं मोकळी ठेवा. मग बोटं वळवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक बोट मागे-पुढे हलवा. सुरुवात अंगठ्यापासून करा. बोटांना ताण दिल्याने रक्‍ताभिसरण सुधारतं. स्नायू मोकळे होतात.


अशी जर हातांची निगा राखली तर का नाही आपले हात सुकोमल राहणार?


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)