हातमाग विकास महामंडळात 200 कोटींच्या निधीचा घोटाळा

सीबीआयकडे सोपवले प्रकरण
नवी दिल्ली – हातमाग विकास महामंडळात दोनशे कोटी रूपयाचा घोटाळा झाल्याचे उघडकीला आले आहे. यार्न पुरवठ्यासाठी ठेवण्यात आलेल्या निधीतील हा दोनशे कोटींचा घोटाळा झाला आहे त्याच्या चौकशीची विनंती महामंडळाकडून सीबीआयला करण्यात आली आहे अशी माहिती वस्त्रोद्योग सचिव अनंतकुमार सिंह यांनी दिली.

या प्रकरणाची अंतर्गत चौकशी करण्यात आली त्यात हा घोटाळा निदर्शनाला आला. प्रत्यक्ष यार्न खरेदी न करताच काहीं कंत्राटदारांना हा निधी देण्यात आला असावा असा अधिकाऱ्यांचा कयास आहे. महामंडळाची देशभर कार्यालये आहेत. त्यापैकी अनेक कार्यालयातून अशा प्रकारचे व्यवहार झाले असावेत असा संशय आहे. मंडळाच्या लखनौ आणि नॉयडा भागातील कार्यालयामधील यार्न खरेदीच्या नावाखाली झालेला घोटाळा प्रथम निदर्शनाला आल्यानंतर या प्रकारचा संपुर्ण तपास करण्यात आला त्यावेळी त्याची व्याप्ती खूपच मोठी असल्याचे निदर्शनाला आल्याने हा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नॅशनल हॅन्डलूम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ही वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. दरम्यान या प्रकरणात कार्पोरेशनने तीन जणांना निलंबीत केले असून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)