हातमाग महामंडळाच्या निवृत्त कामगारांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न सोडविण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : हातमाग महामंडळाच्या निवृत्त कामगारांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न सोडवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  दिले.सह्याद्री अतिथीगृह येथे आज हातमाग कामगारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. त्यावेळी वेतनश्रेणीबाबत विस्तृत चर्चा झाली.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले, हातमाग कामगारांचे प्रश्न आर्थिक बाबींशी संबंधित आहेत. त्यांची देणी देण्यासाठी शासनाची भूमिका सकारात्मक आहे. 5 व्या वेतन आयोगाप्रमाणे कामगारांची वेतननिश्चिती करुन त्यांची देणी द्यावी. 2008 पूर्वी जे कामगार निवृत्त झाले, त्यांनाही आर्थिक फरक द्यावा. या प्रकरणी  न्यायालयाने  केलेल्या सूचनेनुसार योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीला वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख, आमदार विकास कुंभारे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यू. पी. एस मदान, वस्त्रोद्योग विभागाचे सचिव अतुल पाटणे, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष राजेश नगरधनकर, सचिव जनार्धन जुनघरे उपस्थित होते.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)