नवी दिल्ली – वस्त्रोद्योग क्षेत्राच्या विकासासाठी राज्यांच्या वस्त्रोद्योग मंत्र्यांनी आणि प्रतिनिधींनी निर्णय प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावावी असे आवाहन केंद्रीय वस्त्रोद्योग, माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी केले आहे. त्यांनी उज्वला योजनेसारख्या योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचत असल्याची केंद्र आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी खातरजमा करावी असे आवाहन त्यांनी केले.
केंद्र सरकारच्या हातमाग आणि हस्तकला क्षेत्राबाबतच्या योजनांचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी राज्यांच्या वस्त्रोद्योग मंत्र्यांची नवी दिल्लीत बैठक घेण्यात आली त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्यांच्या वस्त्रोद्योग मंत्र्यांनी हातमाग आणि हस्तकला ज्या ठिकाणी प्रामुख्याने आणि मोठ्या प्रमाणावर आहेत तिथल्या कामाचा नियमित आढावा घ्यावा आणि उद्दीष्टही निश्चित करुन ते गाठण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा