हातमपुरा परिसरात नळांना दूषित पाणी

नगर – मनपाच्या नवीन प्रभाग 11 मधील चाबुकस्वार गल्ली, हातमपुरा परिसरात नळवाटे दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांनी शिवसेना अल्पसंख्याक आघाडी प्रमुख रियाज सय्यद यांच्याकडे शनिवारी सकाळी केली. त्यांनी महापौर सुरेखा कदम यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर कदम यांनी या भागात पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. सोमवारपर्यंत दुरुस्ती करण्याचे आदेश कदम यांनी दिले.
कदम यांनी खराब पाण्याची पाहणी करून परिसरातील उपस्थित कर्मचाऱ्याला खराब पाणीपुरवठा कुठून व कोणत्या पाईपलाईनमधून होतोय हे तातडीने शोधण्यास सांगितले. मनपा अधिकारी काकडे यांच्याशी चर्चा करून सोमवारी कोणत्याही परस्थितीत पाईपलाईन दुरुस्त करा, असा आदेश त्यांनी दिला. या प्रसंगी सय्यद म्हणाले, की सोमवारी सकाळी पुन्हा महापौरांशी संपर्क साधू. पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन दुरुस्त करून नागरिकांना सुरळीत पाणी दिले जाईल. या वेळी ईश्वर पवार, हेमा सोनग्रा, गुणवंती पवार, नदीम कुरेशी, हंजला कुरेशी, इरफान शेख व परिसरातील नागरिक उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)