पुणे – एटीएममध्ये पैसे काढायला गेलेल्या तरूणाचे हातचलाखिने एटीएम, पिन कोड प्राप्त करून दहा हजार रुपये लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. धनकवडी, बालाजीनगर येथील युनियन बॅंकेच्या एटीएममध्ये बुधवारी दुपारी 1.45 च्या सुमारास हा प्रकार घडला.
याबाबत रोहित चव्हाण (वय 27, रा. सुपर बिबवेवाडी) याने फिर्याद दिली आहे. फिर्यादी त्याचे युनियन बॅंकेचे कार्ड घेऊन एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याने एटीएम कार्डचा पिन प्रेस केला. हा पिन अनोळख्या व्यक्तीने पाहिला. मात्र, एटीएम मशिनमधून पैसे आलेच नाहीत. त्यावेळी पाठीमागे असलेल्या दोन व्यक्तींनी एटीएम कसे वापरायचे, हे सांगण्याच्या बहाण्याने फिर्यादीकडून एटीएम कार्ड घेतले. ते कार्ड शर्टास फुसले. त्यानंतर हातचलाखिने फिर्यादीला त्याच्याऐवजी युनियन बॅंकेचे दुसरे एटीएम कार्ड दिले. फिर्यादीचे एटीएम कार्ड लांबविले. त्यानंतर दोन वेळा प्रत्येकी पाच हजार असे दहा हजार रुपये फिर्यादीच्या खात्यातील लांबविल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. सहकारनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक व्ही.बी.कोळी अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)