हातगाडी, टपरीधारक वापरणार कापडी पिशव्या

चिंचवड स्टेशन : प्लास्टीकऐवजी ग्राहकांना कापडी पिशव्या देण्याचा निर्धार केल्यानंतर विक्रेत्यांना महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या वतीने कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
  • महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचा निर्णय

पिंपरी (प्रतिनिधी) – प्लास्टीक पिशव्यांचा वापरामुळे होत असलेली पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे सभासदांनी एकत्र येऊन ग्राहकांना कापडी पिशव्या देण्याचा व नेहमीचे ग्राहकांना बाजारातुन वस्तू खरेदी करताना कापडी पिशव्या जवळ बाळगण्याचे आवाहन केले आहे. यावेळी कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

चिंचवड स्टेशन येथे झालेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, कार्याध्यक्ष इरफान चौधरी, बशीर रावळ, आबालाल सुखवाल, मनोज यादव, पप्पूलाल तेली, देवीलाल अहीर, सिराजुद्दीन अन्सारी, अलआउद्दीन मौला, रामा बिरादार, पुष्पेंदर कुशवाह यांच्यासह परिसरातील फेरीवाले उपस्थित होते.

राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाच्या वतीने प्लास्टीक पिशव्या व प्लास्टिकच्या अन्य वस्तु वापरावर 18 मार्चपासून बंदी घातली आहे. पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचे समाजाच्या विविध स्तरांतुन स्वागत होत आहे. यामध्ये फेरीवाले महत्वाची भुमिका बजावु शकतात. ही बाब लक्षात घेऊन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाने फेरीवाल्यांशी चर्चा करुन, या उपक्रमाला हातभार लावण्याचा निर्णय घेतला आहे. फळ, भाजीपाला व खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी याला होकार दिला आहे.

यावेळी काशिनाथ नखाते म्हणाले की, जगभरातील समुद्रांमधील 80 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक कचरा हा प्लास्टिकचा असतो. एकदा निर्माण झालेले प्लास्टिक हे नष्ट होत नसल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. कचरा साचल्यामुळे सुपीक जमिनी नापीक झाल्या आहेत. असे धोकादायक प्लास्टिक पाण्यातील व जमिनीवरील प्राण्यांनी अन्न म्हणून खाल्ल्यामुळे त्यांच्या पचन प्रक्रियेवर परिणाम होऊन ते मृत पावतात. यामुळे प्लास्टीकवरील बंदीचे स्वागत करुन, कापडी पिशव्या वापरावर भर देण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)