हातकणंगलेमध्ये मराठा आंदोलक महिलांनी शिवसेना आमदाराला बांगड्या दाखवल्या

कोल्हापूर – हातकणंगल्यातील शिवसेनेचे आमदार डॉक्‍टर सुजीत मिणचेकर यांना मराठा आंदोलक महिलांनी थेट बांगड्या दाखवत “चले जाव’चा नारा दिला. आमदार मिणचेकर हे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला भेट देण्यासाठी गेले होते. त्यावेळी आंदोलक महिलांनी आक्रमक पवित्रा घेत सुजित मिणचेकर यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. इतकंच नाही तर, आरक्षण देता येत नसेल तर बांगड्या भरा, अशी आगपाखडही त्यांच्यावर करण्यात आली.

जे आमदार, राज्यकर्ते निष्क्रिय आहेत, त्यांना आम्ही बांगड्यांचा आहेर पाठवतो, बांगड्या भरा आणि घरात बसा, असे महिलांनी ठणकावले. आरक्षणासाठी आमदार-खासदारांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राज्यभरातून केली जात आहे. तशीच मागणी सुजित मिणचेकर यांच्याकडेही करण्यात आली. त्यावर आमदार मिणचेकरांनी तसा राजीनामा देता येत नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या परवानगीनेच पुढची कारवाई करावे लागेल, अशी सारवासारव केली. त्यावेळी आक्रमक झालेल्या महिलांनी जे आमदार निष्क्रिय आहेत, त्यांना आम्ही बांगड्यांचा आहेर पाठवतो, बांगड्या भरा आणि घरात बसा, असे ठणकावले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)