हाणामारीत पोलीस कर्मचाऱ्यांसह दोन जखमी

देहुरोड – जुन्या भांडणाचा राग धरुन कॅरम खेळत बसलेल्या मित्रांना पाच ते सहा जणांनी लाकडी दांडके, स्टॅम्प आणि सिमेंटच्या ब्लॉकच्या सहाय्याने मारहाण केली. या घटनेत मध्यस्थी करणारा पोलीस शिपाई जखमी झाला आहे. शुक्रवारी (दि.26) रात्री दहाच्या सुमारास महालक्ष्मी चौकातील संत तुकाराम बिल्डिंगच्या तळमजल्यावर हा प्रकार घडला.

प्रशांत गायकवाड असे जखमी पोलिसाचे नाव आहे. सध्या त्यांची नेमणूक आळंदी येथे आहे. घटनेच्यावेळी ते कामावर (ऑनड्युटी) नव्हते असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी सचिन काळोखे, बबलू काळोखे, सक्‍या उर्फ विजय काळोखे, प्रशांत साळुंखे, सुमित हगवणे, हर्षद काळोखे ( सर्व रा.देहुगाव ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपक रावसाहेब मोहिते (वय 27, रा. देहुगाव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक छाया बोरकर या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)