हाडेही सजीवच असतात…

सुदृढ हाडे जीवित उती असतात, ज्यामध्ये नव्या हाडांच्या निर्मितीसोबत, जुन्या हाडांच्या क्षय होण्याबरोबर जीवनभर सतत बदलत असतात. सक्रिय आणि स्वयंसिद्ध राहण्यासाठी हाडांच्या रोगांपासून वाचणे आणि हाडांना निरोगी ठेवणे गरजेचे असते. अंदाजे 35 वर्षांपर्यंत हाडांच्या क्षमतेत वाढ होत असते, या कालावधीच्या दरम्यान जुनी हाडे शीघ्रगतीने क्षय पावतात आणि त्यांच्या जागेवर नवीन हाडांची निर्मिती होते. काही पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये नेहमी, हाडांचा क्षय गंभीर विषय असतो. त्यांची हाडे दुर्बळ, नाजूक बनतात आणि त्यांच्या तुटण्याची शक्‍यता वाढते. या स्थितीला ओस्टोयोपोरोसिस असे म्हणतात. आता आपल्याला या गोष्टीची माहिती आहे, की कशा प्रकारे या रोगामुळे हाडांचे कशा प्रकारे रक्षण करता येते आणि त्यांना सुदृढ ठेवता येऊ शकते.

हाडांच्या तुटण्यापासून बचाव करणे 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या चार पैकी एक स्त्रियांमध्ये आणि आठपैकी एका पुरुषामध्ये ओस्टेयोपोरोसिसमुळे हाड तुटण्याला सामोरे जाण्याची वेळ उदभवते. नितंब, माकडहाड आणि मनगटाचे हाड तुटण्याची सर्वात जास्त शक्‍यता असते. स्त्रियांची जोखीम सर्वात जास्त असते कारण, रजोनिवृत्तीच्या दरम्यान आणि त्या नंतर ऑस्ट्रेजोन नावाच्या संप्रेरकाच्या कमतरतेमुळे त्यांच्यात हाडांची झीज वेगाने होते. या काळात संप्रेरक प्रतिस्थापन थेरपीमुळे हाडांची झीज टाळता येऊ शकते. वेदना होण्यासोबत, हाडे तुटण्याची शक्‍यता स्वयंपूर्ण जीवनात अडचण आणते आणि सक्रियतेच्या संबंधात दिर्घकालीन अडचणी निर्माण होऊ शकतात. किती भारतीय ऑस्टेयोपोरोसिसने ग्रस्त आहेत, याची माहिती मिळाली नाही आहे. सामान्य कमी पौष्टिकता स्थिती आणि दोषपूर्ण जीवनशैलीमुळे असे अनुमान लावला जातो की,ही संख्या जास्त प्रमाणात असू शकते. कुठल्याही वयात हाड मोडण्यापासुन वाचण्यासाठी व्यक्‍तीमार्फत काही सामान्य उपाय केले गेले पाहिजेत. जसजसे तुमचे वय वाढत जाते, तशी तुमच्या पडण्याची शक्‍यता वाढते यासाठी तुम्ही घराची रचना शक्‍य तेवढी सुरक्षित बनवणे गरजेचे असते.

सरकण्या आणि पडण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या वस्तुपासून सावध राहा. दररोज उपयोगात येणाऱ्या वस्तुंना योग्य त्या उंचीवर ठेवा, ज्यामुळे त्यांना उचलण्यासाठी तुम्हाला ताणण्याची किंवा वाकण्याची गरज भासणार नाही. जिन्यामध्ये योग्य प्रकाश व्यवस्था ठेवावी. नियमित स्वरूपात तुमचे डोळे तपासून घेतल्यामुळे तुमची नजर चांगली असल्याची खात्री मिळू शकेल.
कॅल्शियम आणि ड जीवनसत्वयुक्‍त जेवण हाडांना मजबूत आणी वाढत्या वयाप्रमाणे सुदृढ ठेवण्यासाठी योग्य मात्रेमध्ये कॅल्शियम आणि ड जीवनसत्वाचे सेवन करावे. कॅल्शियम आणि ड जीवनसत्वाने परिपूर्ण पदार्थांमध्ये दूध व दुग्धजन्य पदार्थ, शेंगा, बदाम इ. आणि सुखे मेवे यांचा समावेश होतो. ड जीवनसत्व आणि कॅल्शियमचा पुरवठा सुनिश्‍चित करण्यासाठी वयस्कर व्यक्‍ती बाजारात उपलब्ध असलेल्या गोळ्यांचे सेवन करू शकतात. 500 मिग्रॅम पुरुषांसाठी आणि 1000 मिग्रॅम स्रियांसाठी असे याचे प्रमाण आहे.

निरोगी जीवनशैली 
व्यायामाने हाड्यांच्या आसपासच्या मांसपेशी दृढ होतात. नियमित स्वरूपात भराभर चालण्यासोबत फिरण्यामुळे तुमची हाडे मजबूत राहतात. यामुळे तुमच्या संतुलनात आणि समन्वयात सुधारणा होते आणि तुम्ही पडण्यापासून वाचता. अल्कोहोल आणि तंबाखू हाडांसाठी हानीकारक असते, त्यांच्यापासून बचाव करणे आवश्‍यक आहे. चहा आणि कॉफी कोला पेय पदार्थ आवश्‍यकतेपेक्षा जास्त प्यायल्यामुळे हाडांसाठी जोखीम निर्माण होते, यापासून वाचणे गरजेचे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)