हाजी गुलाम नबी शेख भूमिपुत्र पुरस्काराने सन्मानित

नारायणगाव- आदर्शगाव बस्ती सावरगाव (ता.जुन्नर) येथील गुरुदत्त ग्रामविकास ट्रस्टच्या वतीने पुणे जिल्हा पालकमंत्री यांचे कार्यकारी अधिकारी हाजी गुलाम नबी शेख यांना भूमिपुत्र’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. याप्रसंगी गुरुदत्त ग्रामविकास ट्रस्टचे उपाध्यक्ष दत्तात्रय लोखंडे, केळीचे व्यापारी शांताराम गोरडे, शामकांत गोरडे, उपसरपंच रोहिदास गोरडे, सरपंच माया रोकडे, प्राध्यापक रामदास गोरडे, तंटामुक्ती अध्यक्ष उल्हास गोरडे, प्रकाश गिधे, महादेव बाळसराफ, हरिभाऊ शेलार, गुलाब गोरडे, गोरख जाधव, काशिनाथ आल्हाट व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी गुलाम नबी शेख म्हणाले की, धार्मिक स्थळे ही प्रबोधनाची विचारपीठे असतात. धार्मिक सोहळ्याच्या निमित्ताने समाज एकत्र येतो आणि त्यातूनच मानवता धर्म जोपासला जातो. बस्ती येथील दत्तमंदिर हे जुन्नर तालुक्‍यातील आमजनतेचे प्रसिद्ध ग्रामदैवत आहे. या दत्तमंदिर देवस्थानाला महाराष्ट्र शासनाचा “क’ वर्ग तीर्थस्थान दर्जा मिळवून देण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्नशील राहील. यावेळी बस्ती गावातील ज्येष्ठ 50 नागरिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच रोहिदास गोरडे तर हलगी सम्राट केरबा पाटील संस्थेचे अध्यक्ष काशिनाथ आल्हाट यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)