मुंबई: महामंडळांच्या नियुक्‍त्यानंतर आता फोडाफोडीचे राजकारण सुरु झाले आहे. भाजपने अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्षपद शिवसेना वाहतूक संघटनेच्या हाजी अराफत यांना देताच त्यांनी शिवसेनेला “जय महाराष्ट्र’ करत भाजपत प्रवेश केला.

हाजी अराफत यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला. काही दिवसांपासून त्यांनी शिवसेनेतल्या अनेक नेत्यांवर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. मात्र आधीच नियुक्‍त्या वादात असताना याद्वारे फोडाफोडीचे राजकारण सुरु झाल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान आमदार नरेंद्र पाटील यांचीही भाजपने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळावर केलेली नियुक्ती चर्चेचा विषय ठरली आहे. सत्तापदाचे आमिष दाखवून भाजपकडून दुसऱ्या पक्षांचे नेते फोडले जात आहेत, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

शुक्रवारी महामंडळ नियुक्‍त्या जाहीर झाल्या होत्या. यामध्ये हाजी अराफत शेख यांची महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्षपदी, तर नरेंद्र पाटील यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)