…हाच लोकशाहिरांच्या कार्याचा आवाका!

पिंपरी – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य २७ विविध जागतिक भाषेत भाषांतरीत झालेले आहे. यावरुन या साहित्य सम्राटाच्या कार्याचा आवाका दिसून येतो, असे मत व्याख्याते प्राध्यापक प्रदिप कदम यांनी व्यक्त केले.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रबोधनपर्वाच्या निमित्त आयोजित विचार प्रबोधन पर्वात सामाजिक विषमता, सांविधानिक समानता व सदयस्थिती या विषयावर महाचर्चा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.
या महाचर्चेत अजिंक्य चंदणे, प्राध्यापक धनंजय भिसे, भाऊसाहेब अडागळे, संदीपान झोंबाडे, गणेश क्षिरसागर, मनोज तोरडमल यांनी सहभाग घेतला होता.

-Ads-

प्राध्यापक प्रदीप कदम म्हणाले अण्णाभाऊच्या विविध गुणांची आणि कलेची आवड असणारी भूमिका लक्षात घेऊन पुढच्या पिढीला त्यांचे साहित्य वाचण्यासाठी प्रवृत्त करणे गरजेचे आहे. असे सांगून त्यांनी अण्णाभाऊच्या पुतळयाला अथवा प्रतिमेला केवळ पुष्पहारच अर्पण न करता त्यांच्या कार्याची ओळख ‍ विदयार्थी व युवकांना करुन दयावी असेही ते यावेळी म्हणाले.

अजिंक्य चंदणे यांनी त्यांचे विचार मांडताना सामाजिक विषमता ही भारतात निर्माण केली गेली आहे. विषमता ही जाती – जातीत, धर्मा – धर्मात तर आहेच परंतू ती शिक्षण, साहित्य, व उदयोग क्षेत्रातही दिसून येते यामुळे सर्वांनी संघटीत होऊन सामाजिक विषमता दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत असे उपस्थितांना आवाहन केले.

यावेळी प्राध्यापक धनंजय भिसे, मनोज तोरडमल, भाउसाहेब आडागळे, गणेश क्षिरसागर,संदीपान झोंबाडे यांनीही आपले विचार मांडले चर्चासत्राचे सूत्रसंचालन गणेश क्षिरसागर यांनी केले. तत्पूर्वी छाया कोकाटे यांच्या प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यानंतर ख्यातनाम लोकशाहीर संभाजी भगत यांच्या शाहीरी जलसा या कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली.

तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा या कांदबरीवर आधारीत विजय रास्ते यांनी सादर केलेल्या फकीरा या नाटकाने शुक्रवारच्या कार्यक्रमांची सांगता झाली. यावेळी अरुण जोगदंड, नितीन घोलप, अनिल सौंदाडे आदी उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)