हाक तुमची, साथ आमची ः अशोक शिर्के

औंध ःमार्गदर्शन करताना लाचलुचपत विभागाचे अशोक शिर्के.

भ्रष्टाचार थांबवण्यासाठी प्रेरणादायी संवाद
औंध, दि. 29 (वार्ताहर) – लाचलुचपत प्रतिबंधक सातारा विभागाच्यावतीने लोक जनजागृती कार्यक्रम नुकताच औंधमध्ये श्री स्वामी समर्थ मंदिरात पार पडला. यात लोकांना मार्गदर्शन व भ्रष्टाचार थांबवण्यासाठी प्रेरणादायी संवाद घडवण्यात आला
औंध गावातील युवा पिढी व ग्रामस्थांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची जवळून ओळख होण्याच्या हेतूने व समाज जागृतीसाठी गुरुवार, दिनांक 29 रोजी सायंकाळी 5 वाजता श्री स्वामी समर्थ मंदिर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक सातारा विभागाचे पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांनी लोकांना मार्ग मार्गदर्शन केले व लोकांशी संवाद साधत लोकांशी चर्चा केली. यावेळी शिर्के म्हणाले, हाक तुमची साथ आमची 1064 या टोल फ्री हेल्पलाईन नंबर आहे. आम्हाला कधीही कॉल करा तुमच्या मदतीसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. आम्ही स्वतः तुमच्यापर्यंत येऊ यासाठी जास्तीतजास्त लोकांनी पुढाकार घेऊन भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सर्वांनी पुढे यावे असेही आव्हान केले. तुमचे एखादे सरकारी काम अधिकारी सरकारी कर्मचारी यांनी थांबवले असेल तरी आम्हाला याची रितसर तक्रार द्या व तुमच्या कामासाठी अगदी शंभर रुपयाच्या किरकोळ रकमेची जरी मागणी होत असली तरी त्याची तक्रार अवश्‍य द्या. तसेच एखाद्या सरकारी नोकरांनी मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टी तयार केलेली दिसून येत असल्यास त्याचीही आपण तक्रार करावी व तुमच्या गावातील ग्रामपंचायत सरकारी कार्यालयासारख्या कार्यालयात जर कामात काही अफरातफर जाणवत असेल तरी आपण आमच्याकडे तक्रार करून चौकशी लावू शकता. अशाप्रकारे लोकांना माहिती देत शिर्के म्हणाले की, या चर्चेतून एक जरी तक्रार मिळाली तरी आमचा हा कार्यक्रम साध्य झाला असे आम्ही मानू. यानंतर कुलकर्णी, ए. एस. आय. यांनीही लोकांना मार्गदर्शन केले व लोकांनी अशा तक्रारी पुढे होऊन द्याव्यात असेही आव्हान केले. लोकांचे काही प्रश्न समजून घेऊन त्याचे आलेल्या सर्व टीमने निरसन केले. या कार्यक्रमास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डीवायएसपी अशोक शिर्के, एएसआय कुलकर्णी, साळुंखे, माने मॅडम, शिंदे हवालदार उपस्थित होते तर गावातील बापूसाहेब कुंभार, चंद्रकांत कदम, हत्तीगोटे, खैरमोडे अण्णा, बाळासाहेब कुंभार, दत्तात्रय शिंदे, अरुण रणदिवे व युवावर्ग उपस्थित होते. यानंतर औंधचे माजी उपसरपंच बापूसाहेब कुंभार यांनी आलेल्या सर्वांचे आभार मानले.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)