हाकेच्या अंतरावरील गावांना विकतचे पाणी हे जनतेचे दुर्दैवच

पाटणकरांवर आ. देसाई यांचे टिकास्त्र

काळगाव – माजी आमदारांचा बालेकिल्ला असणाऱ्या मणदुरे भागातील सुरुल व बिबी या गावांवर पिण्याच्या पाण्यासाठी पैसे मोजण्याची वेळ आली आहे. ही र्दुदैवी बाब असून विकासाच्या केवळ पोकळ गप्पा मारणाऱ्या माजी आमदारांना हाकेच्या अंतरावरील गावांना पाणी देता आले नाही. ही दुर्दैवी बाब असल्याचे टिका आ. शंभूराज देसाई यांनी केली.
बिबी, ता. पाटण येथे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत मंजुर केलेल्या नळपाणी पुरवठा योजनेच्या भूमिपुजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी माजी सभापती मुक्ताबाई माळी, शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार, शिवदौलत बॅंकेचे संचालक अशोकराव पाटील, पांडुरंग घाडगे, यशवंत जाधव, कारखान्याचे संचालक शंकर शेजवळ, बबनराव भिसे, नगरसेवक गणीभाई चाफेरकर, नगरसेविका मनिषा जंगम, माजी पं. स. सदस्य सुरेश जाधव, तानाजी घाडगे, दादा जाधव, बापुराव सावंत, विलास कुऱ्हाडे, उपअभियंता एम. डी. आरळेकर, रामभाऊ देसाई मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. देसाई म्हणाले, बिबी गावच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे विरोधकांनीच विनाकारण राजकारण केले. बिबी गावाच्या योजनेकरीता आवश्‍यक असणारा 45 लाख रुपयांचा निधी मंजुर करावा असे मी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री यांचेकडे प्रस्तावित केले. यामध्ये या विभागातील वाटोळे गावाचाही समावेश आहे.

वाटोळे गावच्या योजनेचे काम पुर्णत्वाकडे जात आले आहे. विरोधकांच्या बालेकिल्ल्यातील पाण्याच्या योजनेचे श्रेय आम्हाला मिळू नये, याकरीता गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात गावातील विरोधक मंडळीनी विरोधकांना आणून या योजनेचे भूमिपुजन केले.विरोधकांनी भूमिपुजन करुनही एक वर्ष झाले तरी या योजनेचे काम का सुरु होवू शकले नाही. या विभागातील जनतेने विकास करणाऱ्यांच्या पाठीशी रहाणे गरजेचे आहे. सुरुल गावातील युवकांच्या आग्रहास्तव याठिकाणी पिण्याच्या पाण्याची योजना यावर्षीच्या राष्ट्रीय पेयजल योजनेमध्ये प्रस्तावित केली असल्याचेही आ. देसाई यांनी सांगीतले. प्रास्ताविक सुरेश जाधव यांनी केले.रामभाऊ देसाई यांनी आभार मानले. यावेळी ग्रामस्थ, युवक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)