‘हाऊसफुल ४’च्या शूटिंगदरम्यान महिला ज्युनिअर आर्टिस्टचा विनयभंग

#मी टू मुळे अडचणीत आलेला ‘हाऊसफुल ४’ चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हाऊसफुल ४ चित्रपटाच्या सेटवर एका महिलेने गैरवर्तणूक झाल्याचा आरोप केला आहे. एका महिला ज्युनिअर आर्टिस्टने सेटवर आपला विनयभंग झाल्याची तक्रार पोलिसांमध्ये नोंदवली आहे.

महिलेने दिलेल्या माहितीनुसार, हाऊसफुल ४ चे शूटिंग सध्या चित्रकूट स्टुडिओमध्ये सुरु आहे. सेटवर मी आणि माझा सहकारी कलाकार एकत्र बसलो होतो. यावेळी पवन शेट्टी आणि सागर इतर चार जणांसोबत तेथे आले आणि माझ्यासोबत असलेल्या मित्राला जबरदस्ती घेऊन जाऊ लागले. यावेळी त्यांनी धमकी देखील दिली. मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी माझा विनयभंग करण्यात आला. याविरोधात मी गुन्हा दाखल केला आहे, असे त्या पीडित महिलेने सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपांमुळे नाना पाटेकरला चित्रपट सोडावा लागला. तसेच मी टू अंतर्गत झालेल्या आरोपानंतर साजिद खान यांनाही हाऊसफुल ४च्या दिग्दर्शक पदावरून पायउतार व्हावे लागले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)