“हाऊसफुल्ल 4’मध्ये कृती खरबंदा देखील फायनल

अक्षय कुमारचा बिग बजेट फिल्म “हाऊसफुल्ल 4’मध्ये बॉबी देओल, कृती सेनन, पूजा हेगडे यांचा सहभाग निश्‍चित झाला आहे. आता त्यांच्याबरोबर या सिनेमामध्ये कृती खरबंदादेखील असणार हे निश्‍चित झाले आहे. साजिद नाडियादवालाच्या प्रॉडक्‍शनखाली तयार होणाऱ्या या सिनेमाचे डायरेक्‍शन साजिद खान करणार आहे.

चौथ्या भागामध्ये मूळ सिनेमातील अक्षय कुमार आणि रितेश देशमुख हे दोघेच फायनल आहेत. कृती खरबंडाबरोबर या सिनेमातील सर्व मुख्य कलाकारांची निवड पूर्ण झाली आहे. कृती खरबंदाला “हाऊसफुल्ल 4’च्या आगोदर आपण “राज रिबूट’, “शादी में जरूर आना’ आणि “गेस्ट इन लंडन’ सारख्या सिनेमांमध्ये बघितले आहे. “हाऊसफुल्ल 4′ ही तिच्यासाठी खूप मोठी संधी आहे यात काही शंका नाही.

“हाऊसफुल्ल 4′ हा एक फुल टू धमाल कॉमेडी सिनेमा आहे. पुढच्यावर्षी दिवाळीच्या सुमारास “हाऊसफुल्ल 4′ रिलीज होणार आहे. ही आतापर्यंतची सर्वात महागडी फिल्म असणार आहे. या सिनेमाचे बजेट 200 कोटी रुपये निश्‍चित करण्यात आले आहे. यातील स्पेशल इफेक्‍टसाठी हॉलिवूडवरून व्हीव्हीएक्‍स टीमला पाचारण करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)