हसीन जहाँने शमीसाठी व्यक्त केली काळजी

नवी दिल्ली : क्रिकेटर मोहम्मद शमी नुकताच कार अपघात गंभीर जखमी झाला होता. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. दरम्यान, अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पत्नी हसीन जहाँने काळजी व्यक्त केली आहे. हसीन जहाँला जेव्हा शमीच्या अपघाताची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी, ‘आपल्याला बातमी ऐकून धक्का बसला आहे. शमी सुखरुप रहावा यासाठी देवाकडे प्रार्थना करेन’. म्हटले.

हसीन जहाँने आपल्याला शमीचे वाईट व्हावे असे अजिबात वाटत नसल्याचेही म्हटले आहे. आपण शमीचे कट्टर शत्रू नाही आहोत. शमी लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी देवाकडे प्रार्थना करेन असे त्यांनी म्हटले आहे. शनिवारी रात्री मोहम्मद शमी कारने देहरादूनहून दिल्लीसाठी निघाला होता. यावेळी एका ट्रकने त्याच्या कारला धडक दिली. अपघातात शमीला जखमा झाल्या असून डोक्याला काही टाके पडले आहेत. सध्या त्याला देहरादूनमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)