हवेली तालुक्‍यात सामाजिक जाणिवेतून रक्षाबंधन

वाघोली- हवेली तालुक्‍यात सध्या रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला असला तरी याच सणाच्या निमित्ताने सामाजिक जाणिवबरोबर नागरिकांत पर्यावरण रक्षणाच्या बंधनाचे अनोखे दर्शन पहावयास मिळात आहे.
हवेली तालुक्‍यातील अनेक गावांत हा सण भावाला बहिणीने राखी बांधून साजरा केला. मात्र, यावेळेस अनेक शाळांत देशाच्या सीमेवर तैनात असणाऱ्या भारतीय सैन्य दलातील सैनिकांना राख्या पाठवून साजरा करण्यात आला. तर काही शाळांत अंध, अपंग बांधवांना राखी बांधून हा सण साजरा केला. त्याचप्रमाणे काही शाळांत पोलीस बांधवांना राख्या बांधून तर, विद्यार्थ्यांबरोबर महिला बचत गटाच्या सदस्यांनी देखील पोलीस बांधवांना राख्या बांधून हा सण साजरा केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेम तसेच मानवता या मूल्याचे संवर्धन या सणाच्या निमित्ताने झाले. याचबरोबर पर्यावरण रक्षणाच्या हेतूने मानवाला प्राणवायू देणाऱ्या अनेक वृक्षांचे रक्षण होण्यासाठी अनेक महिला, शालेय विद्यार्थिनींनी झाडांना राख्या बांधून हा सण साजरा केला आहे. सामाजिक जाणिवेबरोबर आता जागृती या सणाच्या निमित्ताने तालुक्‍यात पहावयास मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)