हवेलीत वाळू माफियांना दणका

file photo

महसूल पथकाची कारवाई


20 लाखांचा महसूल वसूल करणार

थेऊर- पुणे-सोलापूर महामार्गावर शेवाळेवाडी ते कवडीपाट टोलनाका दरम्यान अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करीत आठ वाळूची वाहने ताब्यात घेत हवेली तहसिलदारांनी वाळू माफियांना दणका दिला. या कारवाईमधून 12 लाख 12 हजार 800 रुपये महसूली दंड व आठ लाख रुपये शास्तीची रक्कम असे एकूण वीस लाख रुपये वसूल होण्याची शक्‍यता हवेली तहसिल कार्यालयाकडून व्यक्त केली आहे.

थेऊर-कुंजीरवाडी सजाचे तलाठी संतोष चोपदार, लोणी काळभोरचे तलाठी विष्णू चिकणे, मांजरी बुद्रुकचे तलाठी गोकुळ भगत, कोतवाल अविनाश वाघमारे, सोमनाथ गावडे, जिवन म्हस्के यांच्यासमवेत मंगळवारी (दि.24) रात्री 12 ते बुधवारी सकाळपर्यंत मांजरी ग्रामपंचायत हद्दीत रूकारी पेट्रोल पंप ते मांजरी बाजार समिती दरम्यान पुणे-सोलापूर महामार्गावर ही कारवाई महसूल पथकाने केली.

महसुलच्या कारवाईमध्ये अवैध वाळू ट्रक पकडला की, वाहतूकदार आपली वाहने रस्त्यांकडेला सोडून चावी घेवून पळून जातात. पथक निघून गेल्यानंतर आपली वाहने घेऊन परस्पर जातात, हा अनुभव असल्याने महसूल पथकाने तत्परता दाखवून या वाहनांच्या चाव्या अगोदरच ताब्यात घेतल्याने महसूल पथकाची पुढील रखडपट्टी टळली.

पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी कारवाई मध्ये पकडले गेलेले ट्रक वाळू माफियांनी पळवून नेलेली उदाहरणे आहेत, त्याची पुनरावृत्ती येथे होवू नये म्हणून सदर ट्रक योग्य बंदोबस्तात हवेली प्रांत कार्यालयात लावण्यात आले आहेत. या ट्रक मालकांकडून पुन्हा चोरून व नियमबाह्य वाळू वाहतूक करणार नाही, असे हमीपत्र लिहून घेतले जाणार असून भविष्यात पुन्हा वाळू वाहतूक करताना वाहन आढळून आले तर ते जप्त करण्यात येणार आहे.

हमीपत्र लिहून दिल्यानंतर प्रतिब्रास 37 हजार 900 रुपये दंडाची रक्कम व शास्तीची रक्कम जमा केल्यानंतर वाहनांतील वाळू जप्त करून सदर मोकळे वाहन मालकाच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती हवेलीचे तहसीलदार प्रशांत पिसाळ यांनी दिली. थेऊरचे मंडल अधिकारी चंद्रशेखर दगडे, गौणखनिजचे गणेश गुलाने यांनी ही कारवाई केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)