हवेलीत जमिनीच्या व्यवहारात फसवणुकींचे कोटींची उड्डाणे

विसार घेऊन पसार होणाऱ्यांची संख्या वाढतेय : लॅण्डमाफियांचा सुळसुळाट, राजकीय खतपाणी

दत्तात्रय गायकवाड
वाघोली- हवेली तालुक्‍यामध्ये जमिनीचे व्यवहारांमध्ये सध्या फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. फसवणुकीचे नवे फंडे वापरण्यात येत असल्यामुळे यातून जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारातील विश्‍वासास तडा गेला आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा फटका सर्वसामान्य नागरिकांच्या मुळावर उठला आहे. हवेली तालुक्‍यात जमिनीच्या फसवणुकीच्या तक्रारी दरवर्षी सुमारे 12 ते 13 प्रकरणे होत आहे. हा आकडा पोलीस दप्तरी कमी असली तरी याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात आहे.
गेल्या बारा वर्षांत हवेली तालुक्‍यात गुंतवणूक आणि वाढता विस्तार होत असल्यामुळे दरवर्षी सुमारे दीडशे कोटी रुपयांची फसवणूक होत आहे.

जमिनीच्या खरेदी – विक्रीचे व्यवहार करीत असताना काही मंडळी एकाच जमिनीचे अनेकांबरोबर व्यवहाराची बोलणी सुरू ठेवून तो व्यवहार पूर्ण करण्यासाठी जमिनीच्या व्यवहारातील आगाऊ रक्‍कम तथा विसाररुपी रक्‍कम घेऊन त्याचा दस्त करू लागले आहेत. त्यामुळे एका जमिनीच्या खरेदी – विक्रीचे यापूर्वीही ती जमीन कोणाला विकली आहे. किंवा तशी बोलणी केली आहे. याबाबत तसेच त्या व्यवहारापोटी विसार करून काही रक्‍कम घेतल्याचा पुरावा उपलब्ध होत नसल्याने सध्यातरी एकाच जमिनीचे इतरांना विसार करून त्यापोटी काही रक्‍कम घेऊन फसवणूक केल्याचे दिसत आहे.
जमिनीच्या खरेदी – विक्रीचे व्यवहार करतेवेळी एखादी जागा दुसऱ्याला लिहून देणे व दुसऱ्यांची जागा विकत घेणे यामध्ये प्रामुख्याने ती जागा पाहून त्या जागेची सरकारी मोजणी करून ताबा घेणे अपेक्षित आहे. मात्र, काही ठिकाणी जागेची सरकारी मोजणी न केल्याने त्या जागा सध्या व्यवहारातील मोठा अडसर ठरू लागला आहे. त्या जागा सरकारी मोजणीमध्ये दुसऱ्यांच्या नावावर असल्याचे दिसत असल्यामुळे फसवणूक होत आहे. त्यामुळे ती जागा व खरेदी करण्याची जागा सरकारी मोजणी केल्याशिवाय खरेदी करू नये. सरकारी बोजा अथवा बॅंकांची कर्जे देणे असलेल्या वादग्रस्त जागा खरेदी करताना काही मंडळींकडून बॅंकांची कर्जे, सरकारी बोजा क्‍लिअर करून जागा देतो म्हणून काही मंडळी अशा जागा इतरांना खरेदी करण्यास भाग पाडत आहेत. यातून कालांतराने ती जागा खरेदी करणाऱ्याला मिळत नसल्याने फसवणूक होत आहे. हा सुमारे 25 ते 50 कोटी रुपयांच्या घरात आहे. अनेकांकडील काळा पैसा जागा खरेदीत गुंतवणूक करून तो पैसा पांढरा करण्याच्या नादात काही मंडळीकडून फसवणूक होऊ लागली आहे. यात प्रामुख्याने कोट्यवधी रुपये घेऊन वीस ते पंचवीस लाख रुपयांच्या जागा नावावर करण्यावर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या रकमेच्या पोटी लाख रुपयांची जमीन घेण्याशिवाय काही धनाढ्य मंडळीवर वेळ आली आहे त्यामुळे फसवणूक होत असली तरी फसवणुकीचा गुन्हा दाखल करता येत नाही.
सध्या काही मंडळींकडून एक जागा खरेदी केली असताना त्या जागेचे दुसऱ्यांना पुन्हा खरेदीखत करून देण्याचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे ती जागा यापूर्वी कोणी खरेदी केली आहे की, नाही. किंवा त्या जागेचा यापूर्वी व्यवहार झाला आहे का, हे पाहण्याचा प्रकार काहीकडून होत नाही. यामुळे दोन खरेदी खतांमुळे दोन्हीपैकी एकाची फसवणूक होत असल्याचे समोर येऊ लागले आहे.

 • लॅंड माफियांचा सुळसुळाट
  शेत जमिनीचे व्यवहार करताना काही ठराविक मंडळींकडून कमी पैशात जास्त रकमेची जमीन खरेदी करण्याचा हव्यासापोटी तसेच वादग्रस्त जमिनी तसेच काही मंडळींकडून जाणीपूर्वक व्यवहारांमध्ये फसवणूक करून आर्थिक लाभाबरोबरच जमिनी देखील बळकावल्या आहेत. त्यामुळे हवेली तालुक्‍यात लॅंड माफीयांची संख्या वाढू लागली आहे. त्यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे.
 • आठवड्याभरात तीन गुन्हे दाखल
  बिवरी येथील नंदकुमार किसन गोते व इतर यांच्यावर आठवडाभरात फसवणुकीचे तीन गुन्हे दाखल झाले आहे. या फसवणुकीच्या प्रकारांने हवेली तालुक्‍यात एकच खळबळ उडाली आहे. लोणी कारभोरमध्ये दोन गुन्हे तर यवत पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला आहे. उरुळी कांचन तुपे वस्ती येथे दि. 27 नोव्हेंबर 2018 रोजी 76 लाख 30 हजार 800 रुपये रोख रक्‍कम व चेक स्वरूपात घेऊन फसवणूक झाली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यवत पोलीस ठाण्यात दि.4 डिसेंबर रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 55 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. दि.5 डिसेंबर रोजी 50 लाख रुपयांची फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
  एकाच आठवड्यात तीन गुन्हे दाखल झाल्यामुळे तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. या आठवड्यात एक दीड कोटींवर फसवणुकीची आकडेवारी जात आहे.
 • लोणी काळभोर पोलीस ठाण्यात नंदकुमार गोते यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणाचा तपास सुरू आहे. तपासात काही बाबी निष्पन्न झाल्यानंतर गरज वाटली तर पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहोत.
  – दयानंद गावडे, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
30 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
3 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)