• कंपनीच्या यत्रणेत बिघाड ः गेल्या महिनाभरापासून ग्राहक त्रस्त

लोणी काळभोर – आयडिया या खासगी मोबाइल कंपनीच्या यंत्रणेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पूर्व हवेलीतील आयडियाची सेवा पूर्णपणे कोलमडून पडली आहे. गेल्या महिनाभरापासून सेवा विस्कळीत झाली असूनही कंपनीकडून सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी काही प्रयत्न होताना दिसत नाहीत, त्यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत.
हवेली तालुक्‍याचा पूर्व भाग पुणे शहराचे उपनगर म्हणून आकाराला येत आहे. वाढत्या नागरिकरणामुळे मोबाइल ग्राहकांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्या प्रमाणात पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात मोबाइल कंपन्या अपयशी ठरल्या आहेत. परिणामी ग्राहकांना दर्जेदार सेवा मिळत नाही. बिल मात्र भरमसाट येत आहे.
आयडिया कंपनीचे नेटवर्क आणि सेवेबाबत गेले सहा महिने झाले ग्राहकांची ओरड सुरू आहे; परंतु या ग्राहकांकडे लक्ष द्यायला कंपनीला वेळ नाही. ग्राहक संघटित नसल्याने मोबाइल कंपन्या ग्राहकांचे शोषण करीत आहेत. मोबाइल कंपन्यांच्या मनमानी कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ट्राय ( टेलिकॉम रेग्युलटरी ऍथॉरिटी ऑफ इंडिया ) या संस्थेचेही मोबाइल कंपन्यांवर नियंत्रण राहिलेले दिसत नाही. या संदर्भात कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्रात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तेथे संपर्क होऊ शकला नाही.

  • 3-जी सेवाच नीट नाही 4-जी चा आग्रह कशाला?
    गेल्या काही दिवसांत आयडिया कंपनीच्या ग्राहकाने लावलेला फोन कधीच पहिल्या प्रयत्नात लागत नाही किंवा लागला तर आपला आवाज समोरच्या व्यक्तीला ऐकू जात नाही, तसेच कधी कधी समोरच्या व्यक्तीचा आवाज आपल्याला ऐकू येत नाही. फोन कट करून परत एकदा लावावा लागतो. म्हणजे कंपनीच्या चुकीचा आर्थिक भुर्दंड ग्राहकाला सोसावा लागत आहे. आयडिया कंपनीच्या इंटरनेट सेवेबद्दलही ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. 3-जी सेवा ग्राहकांना व्यवस्थित मिळत नाही आणि 4-जी सेवा घेण्यासाठी कंपनी ग्राहकांना आग्रह करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)