हवेतील घातक घटक पुणेकरांच्या मुळावर

आरोग्य धोक्‍यात : प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना शून्य


कर्वे रस्ता परिसरात सर्वाधिक प्रदूषणाची नोंद


मानवी आयुर्मान घटण्याची सर्वाधिक भीती

पुणे – निरोगी आरोग्यासाठी रोज टेकड्यांवर “मॉर्निंग वॉक’साठी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम करणारे नायट्रोजन ऑक्‍साइड आणि पीएम (पर्टिक्‍युलेट मॅटर) 10, पीएम 2.5 यांसारख्या हानीकारक घटकांचे प्रमाण शहराच्या हवेत वाढत आहे. पण, हे प्रदूषण कमी करण्याबाबत कोणत्याही ठोस उपाययोजना राबविल्या जात नसल्याचे चित्र आहे. परिणामी, नागरिकांच्या आरोग्यावर याचे गंभीर परिणाम होण्याची भीती आहे.

राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ शहरातील हवा गुणवत्तेची सातत्याने तपासणी करते. यासाठी स्वारगेट, कर्वे रस्ता, नळ स्टॉप, पिंपरी-चिंचवड आणि भोसरी या पाच ठिकाणी “रिअल टाइम मॉनिटरिंग’ यंत्रणा उभारण्यात आली आहे. या नोंदीनुसार गेल्या महिनाभरात शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील हवेमधील प्रदूषकांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये कर्वे रस्ता परिसरात “पीएम 10′ या हानीकारक घटकाचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे 177 इतके नोंदविण्यात आले आहे. हे प्रमाण किमान पातळीवर 100 इतके असावे, असे वैज्ञानिकदृष्ट्या सांगण्यात येते. तर, नायट्रोजन ऑक्‍साइड या घटकाचे प्रमाण 164 इतके नोंदविण्यात आले आहे. हे प्रमाण किमान पातळीवर 80 असावे. शिवाय इतर परिसरातही या दोन घटकांची प्रमाणापेक्षा अधिक नोंद आढळली आहे. यासंदर्भातील माहिती “एक्‍यूएलआय’ अर्थात एअर क्वॉलिटी लाइफ इंडेक्‍स यांच्या अहवालात सांगण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहराच्या हवेतील हानीकारक घटकांचे प्रमाण सातत्याने वाढत असताना, प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे. हवेच्या या प्रदूषणाबाबत नेमके काय करावे, याचे उत्तर सापडत नसल्याचे महापालिका अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते. पण, हवा प्रदूषणामुळे पुणेकरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम उद्‌भवण्याची शक्‍यता निर्माण झाली असून श्‍वसनासंदर्भातील आजारांचे प्रमाण वाढत आहे.

प्रदूषणकारी घटकांचे स्रोत :
– वाहनांमधून होणारे कार्बन उत्सर्जन
– धूळ
– सातत्याने लागणाऱ्या आगी
– कंपन्यांमधून होणारे उत्सर्जन


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)