हवाहवाई गर्ल….. वाढदिवसाच्या शुभेच्छा !

भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीत हवाहवाई गर्ल म्हणून एकच अभिनेत्री ओळखली जाते. ती म्हणजे श्रीदेवी…आज अभिनेत्री श्रीदेवीने वयाची 53 वर्षे पूर्ण केली आहे. अर्थात आज या हवाहवाई गर्लचा वाढदिवस….. 13 ऑगस्ट 1963 साली तामिळनाडू श्रीदेवीचा जन्म झाला आहे. तिचे वडील अय्यपण असून पेशाने वकील होते. श्रीदेवीच्या आई चे नाव राजेश्वरी आहे. श्रीदेवीला एक बहिण असून दोन सावत्र भाऊदेखील आहेत. बहिणीचे नाव श्रीलता तर भावाचे आनंद आणि सतीश आहे.
श्रीदेवीने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. ‘कंदन करुनई’ या तामिळ चित्रपटात श्रीदेवी बालकलाकार म्हणून झळकली होती. तिला मल्याळम चित्रपट पुमबत्तीसाठी राज्य सरकारचा उत्कृष्ठ बालकलाकारचा पुरस्कारदेखील मिळाला होता. अनेक पौराणिक चित्रपटामध्ये तिने काम केले आहे. श्रीदेवीने हिंदी, तमिळ आणि कन्नड चित्रपटात आपल्या कसदार अभिनयाची झलक दाखवली आहे. आपल्या व्हर्सटाइल आणि हिंदी चित्रपटात उत्कृष्ठ मानल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीने आपल्या करिअरची सुरुवात सोलवा साल या चित्रपटाद्वारे केली. परंतु, श्रीदेवीला खरी ओळख हिम्मतवाला या चित्रपटामुळे मिळाली. या चित्रपटाच्या यशानंतर श्रीदेवीला सुपरस्टार अभिनेत्रीच्या यादीत गणले जाऊ लागले.
आपल्या करिअरच्या सुरुवातीलाच श्रीदेवीने अनेक चित्रपट केले. तसेच वेगवेगळ्या भूमिकांमधून अभिनयची छापदेखील पाडली. १९८३ मध्ये कमल हसन सोबत सदमा या चित्रपटात काम केले. तिने या चित्रपटात श्रीदेवीने केलेल्या अभिनया आज देखील तोड नाही. त्यानंतर १९८६ मध्ये आलेला नगीणा हा चित्रपटदेखील तिच्यासाठी एक महत्वाचा चित्रपट ठरला. या चित्रपटासाठी देखील तिच्या अभिनयाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. दरम्यान, हवाहवाई गर्ल या नावाने ज्या चित्रपटामुळे आजही श्रीदेवीला ओळखले जाते. तो चित्रपट म्हणजे मि.इंडिया….या चित्रपटात श्रीदेवीने एका महिला पत्रकाराची भूमिका निभावली. १९८९ मध्ये आलेला चालबाज, आणि १९९३ मध्ये आलेला खुदा गवाह हे चित्रपट देखील तिच्या आयुष्यातील माईलस्टोन ठरले.
श्रीदेवीला तीन वेळा फिल्म फेअरचा पुरस्कारदेखील मिळाला आहे. आपल्या करीअरमध्ये अनेकवेळा श्रीदेवीला अपयशालादेखील सामोरे जावे लागले परंतु, यातूनही सावरत तिने आपला स्टेटस कायम उंचावून ठेवला हीच तिची खासियत आहे. जुली, सोलवां सावन, सदमा, हिम्मतवाला, जाग उठा इंसान, अक्लमंद, इंकलाब, तोहफा, सरफ़रोश, बलिदान, नया कदम, नगीना, घर संसार, नया कदम ,मकसद, सुल्तान, आग और शोला, भगवान, आखरी रास्ता, जांबांज, वतन के रखवाले, जवाब हम देंगे, औलाद, नज़राना,कर्मा, हिम्मत और मेहनत, मिस्टर इंडिया, निगाहें, जोशीले ,गैर क़ानूनी, चालबाज, खुदा गवाह, लम्हे, हीर राँझा, चांदनी, रूप की रानी चोरों का राजा, चंद्रमुखी, चाँद का टुकड़ा, गुमराह, लाडला, आर्मी, जुदाई, हल्ला बोल, इंग्लिश विंग्लिश आणि अगदी अलीकडचा म्हणजे मॉम हे तिच्या आयुष्यातील काही यशस्वी चित्रपट आहेत.
1996 साली श्रीदेवी दिग्दर्शक बोनी कपूरबरोबर लग्नगाठीत अडकली. जान्हवी आणि खुशी ही तिच्या दोन्ही मुलींची नावे आहेत. लग्नानंतर श्रीदेवी बॉलिवूडपासून दूर गेली होती. २०१३ मध्ये श्रीदेवीला भारताच्या सर्वोच्च पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आजही पन्नाशी ओलांडल्यावर जिची गणना सौदर्यवती अभिनेत्रीमध्ये केली जाते ती म्हणजे हवाहवाई गर्ल…..श्रीदेवीला वाढदिवसाच्या शुभेच्छा….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)