हवालदाराला चौकीतच मारहाण

पिंपरी – चौकशीसाठी चौकीत बोलावल्याचा रागातून हवालदाराला थेट चौकीत जाऊनच टोळक्‍याने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना पिंपळे सौदागर चौकीत शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली.

सुनील सखाराम बोकड (वय-43, रा. सांगवी) असे मारहाण झालेल्या हवालदाराचे नाव आहे. अनिल गोरख दळवी (वय-30), अविनाश गोरख दळवी (वय-25, दोघे रा. पिंपळे सौदागर), प्रकाश शिवदास कडभणे (वय-23, रा. काळेवाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी एका तरुणास किरकोळ कारणावरुन मारहाण केली होती. याची तक्रार देण्यासाठी संबंधीत तरुण पोलीस ठाण्यात गेला असता आरोपी तेथे आले. सुनील बोकड हे तक्रार घेत असताना त्यांनाच आरोपींनी मारहाण केली व “”घरी कसा जातो चौकात तुला गोळ्या घालतो”, अशी धमकी दिली. तसेच दहशत पसरवण्यासाठी चौकीतील सामानाची तोडफोड केली. पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)