हवामान विभाग संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा नोंदवा

file photo

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पोलिसांत तक्रार

पुणे, दि.8 – यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, हा हवामान खात्याचा अंदाज खोटा ठरला आहे. त्यामुळे आपली व राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून हवामान खात्याच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने दाखल करण्यात आली आहे.
पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला, तरी मराठवाड्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पिके धोक्‍यात आली आहेत. या पार्श्‍वभूमीवर ही तक्रार करण्यात आली आहे. मराठवाड्यातील संघटनेचे अध्यक्ष माणिक कदम यांनी ही तक्रार परभणी पोलिसांत दाखल केली आहे.
विविध प्रसारमाध्यमांमध्ये हवामान खात्याच्यावतीने मराठवाडा व राज्यातील इतर ठिकाणी 2018 मध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता, परंतु, त्यांचा अंदाज खोटा ठरला आहे. मराठवाडा अजूनही कोरडा आहे. मराठवाड्यात आजही 140 महसूल मंडळामध्ये गंभीर पाणी टंचाई व दुष्काळ आहे. विशेष म्हणजे, जून-16 दिवस जुलै-13 दिवस व ऑगस्टमध्ये एकही दिवस पाऊस झालेला नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणेने खत-बियाणे, औषधी उत्पादक कंपन्यांकडून विविध प्रकारचे पॅकेज घेऊन व शेअर बाजारातून उलाढाल वाढविण्यासाठी चुकीची माहिती महाराष्ट्र शासन व शेतकऱ्यांना दिली, असा आरोपदेखील करण्यात आला आहे. त्यामुळे याबाबत चौकशी करुन हवामान खात्याच्या संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, असेही कदम यांनी तक्रारीत म्हटले आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)