हवामान बदलाचा परिणाम कृषी क्षेत्रावर – मुख्यमंत्री

मुंबई : हवामान बदलाचा परिणाम मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रावर होत असून त्यावर उपाययोजना करायची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विधीमंडळ सभागृहात आयोजित ‘बदलते हवामान : आव्हाने आणि उपाययोजना’ या विषयावरील चर्चासत्रात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

फडणवीस म्हणाले, वातावरणीय बदलामुळे पर्जन्यमान कमी झाले आहे. कधी काही भागात जोरदार अतिवृष्टी होते तर कुठे गारपीट होते. शेतातील उभी पिके उद्ध्वस्त होतात. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहते. दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होते. यामध्ये शेतकरी, गरीब वर्ग यांना जास्त झळ बसते. शाश्वत शेती करायची असेल तर वातावरणातील बदल समजून घेतला पाहिजे. 2030 पर्यंत काही भागात मोठ्या प्रमाणात तापमान वाढणार असून पावसाचे प्रमाण अत्यल्प राहणार आहे. हा शास्त्रज्ञांनी दिलेला इशारा आहे.

तापमान वाढ आणि बदलत्या हवामानामुळे नदी, ओढ्यांचे विहीरीचे पाणी आटले आहे. पाण्याचे स्त्रोत बंद झाले आहेत. आपण जलयुक्त शिवार मोहीम राबवली. त्यामुळे पाण्याचे नियोजन करणे शक्य झाले आहे. जगभर जंगल तोड होत आहे. जंगल क्षेत्र कमी होत आहे. शासनाने जंगल तोडीवर कडक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे वन्य जिवांचे, पशुपक्षांचे रक्षण झाले आहे. बांबू वन क्षेत्र वाढविले आहे. आज शहरात कचऱ्याचा आणि सांडपाण्याचा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे नदीचे प्रदुषण वाढले आहे. त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. त्यासाठी समाजात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)