हवामान बदलांविषयी गांभीर्याने निर्णय घ्या ; दोन वर्षच उरली

अन्यथा जगाला भोगावे लागणार गंभीर परिणाम

संयुक्तराष्ट्रे: जागतिक हवामान बदलांविषयी जगाने गंभीर दखल घेऊन उपाययोजना करण्याची गरज आहे येत्या दोन वर्षांत त्याविषयी गांभीर्याने उपाययोजना केल्या नाहीत तर साऱ्या जगालाच त्याचे गंभीर परिणाम भागावे लागणार आहेत असा निर्वाणीचा इशारा संयुक्तराष्ट्रांचे सरचिटणीस ऍन्तोनिओ गुटेर्रेस यांनी दिला आहे. संयुक्तराष्ट्रांच्या आमसभेत बोलताना ते म्हणाले की जगाला नैसर्गिक आपत्तीपासून वाचवण्यासाठीची वेळ वेगाने निघून जात आहे. सन 2018 हे साल जगातील आत्तापर्यंत सर्वात उष्ण साल म्हणून नोंदवले जात आहे याची जाणिवही त्यांनी यावेळी करून दिली.

ते म्हणाले की आपण 2020 सालापर्यंत याविषयीच्या उपाययोजना परिणामकारपणे राबवण्याची गरज आहे ते जर झाले नाही तर त्यापुढील स्थिती आपल्या हातात राहणार नाही. जागतिक नेत्यांना हा वातावरण बदलाचा धोका पुर्णपणे लक्षात आला आहे आणि त्यानुसार त्यांनी त्याला आवर घालण्यासाठी सन 2015 मध्ये पॅरीस करार केला आहे. जगाचे तापमान 2 अंश सेल्सीयसने कमी करण्याचे साऱ्या देशांनी मान्य केले आहे.

या शतकाच्या अखेरीपर्यंत तापमान वाढीचे प्रमाण दीड अंश सेल्सीयसपर्यंत खाली आणणण्याचे उद्दीष्ट आहे. या उद्दीष्ट पुर्तीसाठी साऱ्या जगातील देशांनी साथ देण्याची गरज आहे असे त्यांनी म्हटले आहे. जगातल्या सर्वांनीच आता आपले पर्यावरण रक्षण करण्याची गरज असून त्यासाठी राजकारणी, व्यावसायिक, उद्योगपती, वैज्ञानिक अशांनी आपआपल्या परिने योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)