हवामानातील बदलाचा ‘जलयुक्त शिवार’ला धोका

संग्रहित छायाचित्र

पुणे- जलयुक्त शिवार अभियानची प्राथमिक तत्वे भक्कम आहेत. त्यामुळे महाराष्ट्र दुष्काळ मुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. मात्र हवामानातील बदल हा जलयुक्त शिवार अभियानापुढे मोठा धोका आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने आवश्‍यक ती पाऊले उचलणे अपेक्षित आहे, असे वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (डब्ल्यूओटीआर) संस्थेचे

कार्यकारी विश्वस्त आणि सहसंस्थापक क्रिस्पिनो लोबो यांनी येथे सांगितले.
जागतिक जलदिनाच्या निमित्ताने विधीमंडळाच्या सदस्यांना वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टकडून कृषी क्षेत्राशी संबंधित महत्त्वपूर्ण गोष्टीबद्दल सादरीकरण करण्यात आले. बदलते हवामान:आव्हाने आणि उपाययोजना हा सादरीकरणाचा भाग होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.

अनियमित आणि जोरदार पावसामुळे नाला खोलीकरण आणि सरळीकरण, नाला बंधारे, शेती बंधारा आदींवर प्रतिकूल परिणाम होतात, असे सांगून लोबो म्हणाले की, अवकाळी पाऊस, वादळ, तापमानातील वाढ, गारपीट या हवामान बदलांना भविष्यात तोंड द्यावे लागणार आहे. बदलत्या हवामानाच्या पार्श्‍वभूमीवर राज्याला प्रतिकारक्षम करण्यासाठी काही ठोस उपाययोजना कराव्या लागतील.

हवामान बदलाचे अंदाजित परिणाम आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन मृदृ-जलसंधारणाच्या उपायांची आखणी आणि अंमलबजावणी करणे, वनांचे संरक्षण, वृक्षारोपणाला प्राधान्य देणे, लोकसहभागातून पाण्याचा ताळेबंद, पाणी वापराची कार्यक्षमतेला प्रोत्साहन देणे आदी बाबींचा यात समावेश आहे. शाश्वत शेतीसाठी पाण्याचा ताळेबंद आवश्‍यक आहे. पाणी सुरक्षा ही बदलत्या हवामानाशी संबंधित असल्यामुळे वॉटर संस्थेने गावांमध्ये पाणी कारभारी (वॉटर स्टेवॉर्डशीप इनिशिएटिव्ह) कार्यक्रमाची सुरुवात केली आहे.असे ही त्यांनी सांगितले


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)