हवामानाची गुणवत्ता चांगली राखल्यास भारतीयांचे आयुष्य चार वर्षांनी वाढणार – डब्ल्युएचओ

नवी दिल्ली – हवामानाची गुणवत्ता चांगली राखल्यास भारतीयांचे आयुष्य चार वर्षांनी वाढण्याची शक्‍यता असल्याचे डब्ल्युएचओ म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने केलेल्या संशोधनात आढळून आले असून त्यासाठी त्यांच्या मानांकनानुसार हवामानाची गुणवत्ता राखणे महत्वाचे असल्याचे त्यांनी आपल्या निरिक्षणात नोंदवले आहे.

डब्ल्युएचओच्या म्हणण्यानुसार भारतामधिल प्रशासन वातावरणाच्या दृष्टीने आवश्‍यक काळजी घेत नाही त्यामुळे जवळपास करोडो लोकांचे आयुष्यमान हे कमी झाले असून जर भारतीय प्रशासनाने आवश्‍यक काळजी घेतली तर हेच आयुष्यमान आणखीन चार वर्षांनी वाढण्याची शक्‍यता आहे. तसेच अशा समस्यांवर मात करण्यासाठी संशोधकांनी पर्याय सांगितले असून ज्यात अतिरीक्त प्रमाणात प्रदुषण झाल्यास अधिक आर्थीक दंड अथवा शुल्क लागु करण्याचा एक पर्याय त्यांनी उपलब्ध करुन दिला आहे.

भारताच्या वायू गुणवत्तेस सुधारण्यास मदत करण्यासाठी शिकागो विद्यापीठ आणि हार्वर्ड केनेडी स्कूलमधील संशोधकांनी शिकागो विद्यापीठातील एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूशनने केलेल्या अभ्यासात सांगितले आहे की, 60 कोटींपेक्षा जास्त भारतीय लोकसंख्या सध्या मानका पेक्षा उत्तम हवामानात राहते त्यामुळे त्यांचे आयुश्‍यमान आणि प्रकृत्ती उत्तम राहिल मात्र उर्वरीत जनता ही मानका पेक्षा खराब वातावरणात राहाते त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर त्याचा गंभीर परिनाम होउ शकतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)