हवाई दलाचे लढाऊ विमान उत्तर प्रदेशात कोसळले ; पायलट सुरक्षित

नवी दिल्ली: भारतीय हवाई दलाचे एक लढाऊ जाग्वार विमान उत्तर प्रदेशात कोसळले आहे. सोमवारी दुपारी ही दुर्घटना घडली. हवाई दलाच्या गोरखपूर हवाई तळावरून नियमित प्रशिक्षणासाठी या जाग्वार विमानाने उड्डाण केले होते. उड्डाण केल्यानंतर 10-15 मिनिटातच हे विमान कुशीनगरच्या ग्रामीण भागातील एका शेतात कोसळल्याची माहिती देण्यात आली आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार शेतात विमान कोसळताच त्याचे तुकडे झाले आणि त्यांनी पेट घेतला.

विमानात तांत्रिक दोष असल्याचे लक्षात येताच पायलटने प्रसंगावधान दाखवत दाट लोकवस्तीच्या भागाकडून दूरवर शेताकडे विमान नेले. त्यामुळे नागरी भागाचे काही नुकसान झाले नाही. विमान कोसळण्यापूर्वी पायलट स्वत:ला सुखरूप वाचवण्यात यशस्वी झाला. हवाई दलाकडून या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
गेल्या वर्षी गुजरातच्या कच्छ भागात हवाई दलाचे एक जाग्वार लढाऊ विमान कोसळले होते. त्या दुर्घटनेत विमानाचा पायलट संजय चौहान मरण पावला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)