हवाईसुंदरी बनायचंय? 

– अंकिता कुलकर्णी 

मध्यंतरीच्या काळात नीरजा हा चित्रपट आला होता. या चित्रपटातील नीरजा ही एक हवाईसुंदरी असते. तिने आपल्या प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी स्वत:चे बलिदान दिले होते. तिच्या साहसीपणावर बेतलेला हा चित्रपट एकंदरित हवाईसुंदरीच्या जीवनशैलीवर प्रकाश टाकणारा होता. जर आपल्याला आकाशाला गवसणी घालायची असेल तर आपण हवाईसुंदरी होऊन करियरला भरारी देऊ शकता. अनेकांनी लहानपणी आपण एखाद्या विमानाला पाहून आपणही त्यात बसून उडावे, अशी मनोकामना व्यक्‍त केलेली असते. जर जगभरात फिरण्याची हौस आहे आणि मनात आकाशात भरारी घेण्याचे स्वप्न बाळगले असेल तर आपण हवाईसुंदरी होण्याचा विचार करायला हवा. आपली इच्छाशक्ती जबरदस्त असेल आणि आपले व्यक्तिमत्त्व अधिक आकर्षक करु इच्छीत असाल तर आपण हवाईसुंदरी होऊ शकता. तसे पाहिले तर वर्तमानकाळात नागरी उड्डयन क्षेत्र वेगाने प्रगती करत आहे. अशा स्थितीत हवाईसुंदरीचे स्वप्न पाहणाऱ्या युवती करियरमध्ये गगनभरारी घेऊ शकतात. 

आवश्‍यक कौशल्य : 
हवाईसुंदरी क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आकर्षक व्यक्तिमत्त्वाबरोबरच शारीरिक सक्षम असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्याला अनेक भाषांचे ज्ञान, बोलण्यात नम्रता, संवाद कौशल्य असणे आवश्‍यक आहे. यशिवाय सांघिक भावना, कामातील वक्तशीरपणा, निटनेटकेपणा, सेन्स ऑफ ह्यूमर, सकारात्मक दृष्टिकोन, समयसुचकता हे गुण अंगी असणे गरजेचे आहे. आपल्याला प्रत्येक प्रकारच्या स्थितीचा मुकाबला करण्यासाठी शारीरिकच नाही तर मानसिकरुपाने देखील सक्षम असणे तितकेच महत्त्वाचे आहे.

प्रमुख संस्था : 
फ्लाइंग क्विन एअर होस्टेस ऍकडॅमी, नवी दिल्ली
विंग्स एअर होस्टेस अँड हॉस्पॅटिलिटी ट्रेनिंग, बडोदा
टीएमआय ऍकडॅमी ऑफ ट्रॅव्हल टूरिझम अँड एव्हीएशन स्टडिज, मुंबई.
एअर होस्टेस ऍकडॅमी बंगळूर, कर्नाटक.

कामाचे स्वरूप : 
एअर होस्टेस अर्थात हवाईसुंदरी या हवाईप्रवासात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत असतात. इन फ्लाईटची घोषणा करणे, क्रु मेंबरमध्ये समन्वय ठेवणे, विमानातील प्रवाशांची सुरक्षा, प्रवाशांना मदत करणे, वातावरणाची माहिती वेळोवेळी देणे, वरिष्ठांना सहकार्य करणे, प्रवाशांना सामान ठेवण्यासाठी आणि बसण्यासाठी मदत करणे, सिट बेल्ट बांधण्याबाबत मार्गदर्शन करणे, आपत्कालिन काळात ऑक्‍सिजन माक्‍सचा वापर कसा करावा, याची माहिती देणे, प्रवाशांची तब्येत अचानक बिघडल्यास आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी हालचाली करणे, प्रवाशांना भोजन उपलब्ध करून देणे, सुरक्षा उपकरणाचीं माहिती देणे, आपत्कालिन स्थितीत केल्या जाणाऱ्या कृतीची माहिती देणे यासारख्या बाबींची जबाबदारी हवाईसुंदरीकडे असते.

पात्रता : शैक्षणिक पात्रतेत एअर होस्टेस ट्रेनिंग प्रोग्रॅमसाठी आपल्याला कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाची बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. आपले वय किमान 18 असावे आणि उंची किमान 5 फूट 2 इंच असावी.

उत्पन्न : डोमॅस्टिक एअरलाइन्सच्या एअरहोस्टेसच्या वेतनाची सुरवात 25 हजारापासून 40 हजारांपर्यंत आहे. वरिष्ठ पदावर पोचल्यास वेतन 50 हजार ते एक लाखांपर्यंत पोचू शकते. खासगी एअरलाइन्स कंपन्या हवाईसुंदरींना चांगले पॅकेज ऑफर करतात.

संधी कोठे : डोमेस्टिकपासून ते इंटरनॅशनल आणि खासगी एअरलाइन्समध्ये देखील एअर होस्टेसचा जॉब मिळवता येऊ शकतो. पदोन्नती झाल्यास सिनियर फ्लाइट अटेंडंट किंवा हेड अटेडंड होऊ शकता. याशिवाय व्यवस्थापन पातळीवर देखील आपण काम करण्याची संधी मिळू शकते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)