हळदी-कूंकू महिलांना एक-जूट करण्याचे काम करते

नगर – मकरसंक्रांतीचा पर्वकाळ महिलांसाठी अत्यंत फलदायी असतो. एकमेकींच्या घरी जाऊन त्या लोकविचारांच्या ठेव्याचे आदान-प्रदान करतात.महिला सक्षमीकरणांत चांगल्या विचारांचा नेहमीच मान असतो.महिलांनी महिलांनसाठीएकत्रित येऊन सुख-दुखे जाणून घ्यावी.गल्ली,परिसर,शहर स्वच्छता अभियानात प्रत्येक महिलेने पुढाकार घ्यावा.आज शिक्षणाला विशेष महत्व आहे.पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे येत आहेत,हि अभिमानाची गोष्ट आहे. पर्यावरणाची रक्षाकरण्यासाठी आपण प्रत्येक स्त्रीने रोप लावले पाहिजे. हळदी-कूंकू महिलांना एक-जूट करण्याचे काम करते. असे प्रतिपादन वैशाली नळकांडे यांनी केले .

कल्याण रोड येथील शिवाजीनगर येथे नळकांडे कुटूंबियांच्यावतीने हळदी-कूंकू कार्यक्रमप्रसंगी पर्यावरणाचे रक्षण व त्यात वृक्ष लावून वाढ होण्यासाठी प्रत्येक स्त्रीला रोप देतांना भिमाबाई किसन नळकांडे, मनिषा संतोष नळकांडे, वैशाली श्‍याम नळकांडे. याप्रसंगी दहातोंडे मॅडम, निशांत ढोरे, डॉ.खोपे मॅडम, डॉ.गौरी कर्डिले, चंद्रभागा नळकांडे, सुमन शेळके, शारदा गडाख, सुमन भांबळ, सविता शिंदे, नंदा साबळे, आसराबाई ढाकणे, सोनाली वाजे, लक्ष्मीबाई कोडम, सविता आढाव,मीरा गवळी, सौ.काटे मॅडम व भावनाऋषी सोसा., साईराम सोसा., वंदे मातरम पार्क, गणेश नगर, कवडे वस्ती, आनंद पार्क, अनुसयानगर, आदर्शनगर व कल्याण रोड परिसारातील महिला उपस्थित होत्या.
स्त्रीभ्रूण हत्या थांबवण्यासाठी प्रत्येक महिलेने पुढाकार घेऊन हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयतक्‍ करावेत.महिलांना सामाजिक क्षेत्रात ज्या काही आडचणी असतील त्यांच्या सोडवणुकीसाठी माझा प्रयतक्‍ राहील.असे वैशाली नळकांडे यांनी सांगितले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)