हल्ली मोदी भ्रष्टाचारावर काहीच बोलत नाहीत 

– राहुल गांधी यांचे प्रतिपादन

सागर  – यापुर्वी भ्रष्टाचाराविषयी सातत्याने बोलणारे पंतप्रधान मोदी यांच्या भाषणात सध्या भ्रष्टाचाराचा विषय नसतो. या विषयावर ते बोलणे का टाळत आहेत असा सवाल कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. ते मध्यप्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी येथे आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर सभेत बोलत होते. ते म्हणाले की संपुर्ण देशासाठी चौकीदार म्हणून काम करण्याचा निर्धार मोदी यांनी व्यक्त केला होता पण त्यांनी केवळ आपल्या काही बड्या उद्योगपतींसाठीच चौकीदार म्हणून आत्तापर्यंत काम केले आहे असे ते म्हणाले.

मोदींनी आणलेल्या नोटबंदीमागेही भ्रष्टाचाराचाच इरादा होता असे नमूद करून त्यांनी म्हटले आहे की नोटबंदी हा स्वातंत्र्यानंतरच सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. त्यांच्या या निर्णयाने देशातील गरीब नागवला गेला. ते म्हणाले की मी जेव्हा जेव्हा भाषणात चौकीदार असा शब्द उच्चारतो त्यावेळी उपस्थित लोक चौकीदारही चोर हेै अशा घोषणा देऊ लागले आहेत असेही त्यांनी यावेळी नमूद केले. राफेल घोटाळ्यातील तथ्य फ्रांसचे माजी राष्ट्राध्यक्ष ओलांद यांनी उघड केले आहे. त्याच वेळी त्यांची चोरी उघड झाली आहे. मोदींनी तुमचे पैसे लुबाडून ते उद्योगपती मित्रांच्या घशात घातले आहेत असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

-Ads-

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)