हर एक फ्रेंड जरुरी होता है…(प्रभात open house)

ऑगस्ट महिना सुरु झाला कि तरुणांची लगबग सुरु होते ती फ्रेंडशीप डेच्या तयारीसाठी… या महिन्यातला पहिला रविवार हा फ्रेंडशीप डे म्हणून साजरा केला जातो. शाळा कॉलेजमध्ये तो शनिवारीच साजरा केला जातो… मार्करने हातावर किंवा टी-शर्टवर लिहलेले एकमेकांची नावे, रिबनस, हातात घालायचे बॅन्ड किंवा चॉकलेट असा तरुणाईचा हा मैत्रीचा सण साजरा केला जातो.

शोलेच्या जय-वीरूच्या मैत्रीपासून, राहुल-अंजली ते आताच्या सोनू-टीटू, विरेच्या मैत्रिणी, संजू-कमलीच्या मैत्रीपर्यंत बॉलिवूडने हि “मैत्री” या नात्याला प्राधान्य दिलेच आहे. तसचं आपल्या मराठी चित्रपटही मैत्री हा विषय हाताळायला काही कमी नाहीत. तर अश्या या मैत्री दिनाच्या सर्वांना शुभेच्छा.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

Airtel च्या ‘हर एक फ्रेंड जरुरी होता है’ या वाक्याप्रमाणे आपल्या ही आयुष्यात असे अनेक फ्रेंड येतात. घरातले पहिले मित्र,आई-बाबानंतर शाळेतल्या चड्डी मित्रापासून ते आताच्या ऑफिसच्या मित्रापर्यंत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर नवनवीन मित्र बनत असतात. प्रत्येकजण त्यांचा ठसा आपल्या आयुष्य नावाच्या पुस्तकावर उमटवत असतात. पण काही असे नमुने असतात, जे तुमचा श्वास बनून जातात आणि आयुष्याचं सोनं करतात. आपल्यापेक्षा कधीकधी तेच आपल्या आयुष्याचे निर्णय घेत असतात.

कितीही रुसा, भांडा, अबोला धरा पण एकमेकांसमोर आल्यावर सगळं विसरून पुढे चालणारे मित्र वेगळेच… घरच्यांनंतर तुमच्यावर भरभरून प्रेम करणारे, तुमची काळजी करणारे, कधी मार्गदर्शक तर कधी टिंगल उडवणारे असे हे मित्र… तुमच्या क्रशला आधीच वहिनी समजणारे… पण जिव लावणारे या मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच…

तर अश्या या सगळ्या मित्रांना हैप्पी फ्रेन्डशिप डे आणि सलाम !!!

प्रशांत खोत


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)