हर्षवर्धन पाटलांचा खोटे बोलण्याचा धंदा ! आमदार भरणे यांची टीका

“कर्मयोगी’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्या

रेडा: माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील हे खोटे बोलण्याचा कळस करीत आहेत. खडकवासला संयुक्‍त प्रकल्प कालवे सल्लागार समितीचे सदस्य हर्षवर्धन पाटील असताना, मी सदस्य नाही म्हणून खोटी बेताल वक्‍तव्य करतात. कर्मयोगी साखर कारखान्याचे अध्यक्ष कोण सांगा? दिशाभूल करणे हे बरे नव्हे, त्यामुळे खोटे बोलायचा धंदा सोडून द्या, अशी टीका आमदार दत्तात्रय भरणे यांनी केली.

भरणेवाडी (ता. इंदापूर) येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, लोकप्रतिनिधीच्या जबाबदारीवर बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही. कालवा सल्लागार समितीचे सदस्य हर्षवर्धन पाटील नसतील तर आमदारकीचा राजीनामा देईल, असे खुले आव्हान भरणे यांनी दिले आहे. पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयाने खडकवासला संयुक्‍त प्रकल्प कालवे सल्लागार समिती खरीप हंगाम 2018च्या बैठकीचे निमंत्रण दि.28 सप्टेंबर 2018 रोजी कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षांना समितीचे सदस्य असल्याने हर्षवर्धन पाटील यांना पाठविले आहे. तरी देखील खोट्या पणाचा आव आणित हर्षवर्धन पाटील हे ‘मी कालवा सल्लागार समिती’चा सदस्य नाही, अशी चुकीचे शब्द वापरुन जनतेची दिशाभूल केली करीत असल्याने त्यांनी पहिल्यांदा कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशीही मागणी आमदार भरणे यांनी केली आहे.

इंदापूर तालुक्‍यातील गोर गरीब मागासवर्गीय व उपेक्षित जनतेने खास जनतेची सेवा करण्यासाठी आमदारकीची खूर्चीवर बसवले आहे. व कधीच हवेतून खाली न येणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांना सामान्य जनतेने कायमचे घरी बसवले आहे, हे पाटील विसरले आहेत का? 15 ते 20 वर्षांत आपणाला तालुक्‍यातील शेतीला हक्काचे पाणी देता आले नाही. उलट तालुका वेठीस धरून मंत्रीपद स्वार्थासाठी भोगले. लबाडी करून इंदापूर तालुक्‍यातील जनता हर्षवर्धन पाटील यांना जिंकता येणार नाही. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेली तालुक्‍याची प्रगती पाटील यांना पाहवत नाही. चाललेली विकास कामे टोचतात अशीही टीका आमदार भरणे यांनी केली.

 पाटलांनी राजकीय संन्यास घ्यावा

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते, म्हणून शेतीच्या पाण्याची आवर्तने इंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांना मिळत होती. व मागे कधीच पाणी आमदाराने ऐवढे शेतीसाठी इंदापूर तालुक्‍यात आणले नव्हते; परंतु आमदार दत्तात्रय भरणे यांनी आणून इतिहास रचला त्यामुळे मला खुर्ची खाली करायची गरज नाही, उलट हर्षवर्धन पाटील यांनी राजकीय संन्यास घावा अशीही, जोरदार टीका आमदार दत्तात्रय भरणे यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)