हर्षवर्धन जाधव यांचा शिवसेनेला “जय महाराष्ट्र’

नवीन पक्ष स्थापन करण्याची केली घोषणा
औरंगाबाद – मराठा आरक्षणासाठी पाठिंबा दर्शवून आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. काही दिवसांत नवीन पक्ष स्थापण करणार आहे. त्यामुळे आता माझा शिवसेनेशी काहीही संबंध राहिलेला नाही, असे म्हणत कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेला “जय महाराष्ट्र’ केला आहे.

हर्षवर्धन जाधव म्हणाले, महाराष्ट्रात आतापर्यंतच्या राजकारणामुळे सामाजिक विषमता तयार झाली आहे. ती विषमता मिटविण्यासाठी नवीन राजकीय पक्ष स्थापन करावा काय, याचे चिंतन करण्यासाठी मी तापडिया नाट्य मंदिरात चिंतन बैठक बोलावली होती. बैठकीत अठरा पगड जातींच्या प्रतिनिधींनी मते मांडली. त्यानंतर नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा करून महिनाभरात पक्ष नोंदणी होईल, दोन ते चार दिवसांत पक्षाचे नाव जाहीर करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

-Ads-

न्हावी, माळी, कोळी, धनगर, दलित, राजपूत, ठाकूर, वंजारी, मुस्लिम या प्रत्येक समाजाला त्रास होतो आहे. उत्तम पर्याय म्हणून नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचे सर्वांनी सुचविले आहे. मराठा समाजासाठी पक्ष स्थापन करण्याबाबत मी बोललो होतो; परंतु कालांतराने मला समजले की, मराठा समाज आणि इतर समाजांचे देखील सारखेच प्रश्न आहेत. मला सर्वंकष जाणीव झाली की, राज्य सरकारने सर्व समाजांसमोर प्रश्न निर्माण करून ठेवले आहेत. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन पक्ष काढण्याचे ठरविले. धुळे, नंदुरबार येथील जि.प. निवडणूक पक्ष लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बॅकफूटवर जाणार नाही

माझ्या वतीने शिवसेनेशी काही संबंध राहिलेला नसल्यामुळे मी बॅकफूटवर जाणार नाही. माझे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत व्यक्तिगत चांगले संबंध आहेत, ते आगामी काळातही राहतील. सरकारने मराठा आरक्षण दिले तरी मी राजीनामा परत घेणार नाही, धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे हीदेखील माझी मागणी आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)